Home » पाचक असलेला मुळा सेवन केल्यावर ‘या’ ४ गोष्टी चुकूनही खाऊ नका, नाहीतर आरोग्यावर होतील विपरित परिणाम
Food & Drinks आरोग्य

पाचक असलेला मुळा सेवन केल्यावर ‘या’ ४ गोष्टी चुकूनही खाऊ नका, नाहीतर आरोग्यावर होतील विपरित परिणाम

उत्तम आरोग्यासाठी आहाराचे काही नियम कटाक्षाने पाळावे लागतात. आयुर्वेदात कोणते पदार्थ एकत्र खावे आणि कोणते खाऊ नयेत याबाबत स्पष्ट उल्लेख आहेत. मुळा हा पाचक म्हणून खाल्ला जातो मुळा सॅलड, भाजी, कोशींबीर, पराठे अशा रुपात आवडीने खाल्ला जातो. परंतु मुळ्यासोबत काही गोष्टी खाण आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकत. मुळा प्रकृतीन थंड असून त्यासोबत उष्ण पदार्थ खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकत.

दूध –

मुळ्याचा कोणतीही पदार्थ खाल्ल्यास दुग्धजन्य पदार्थ खाण टाळा. मुळा थंड असून दुधाचा प्रभाव गरम असतो. परिणामी दोन परस्परविरोधी प्रकृती एकत्र आल्यास आपल्याला त्वचेचे विकार होऊ शकतात. परिणामी मुळा खाल्ल्यावर साधारण 2 ते 3 तास दुग्धजन्य पदार्थ खाऊ नयेत.

काकडी –

सलाड करताना काकडी, गाजर, मुळा एकत्र केला जातो. परंतु अशा पध्दतीने काकडी व मुळा एकत्र खाऊ नका. काकडीत एस्कॉर्बिनाज असते व ते विटॅमिन ‘सी’ ला कमी करते. परिणामी काकडी व मुळा एकत्र सेवन करू नका.

आंबट फळे –

मुळा खाल्ल्यानंतर संत्र, मोसंबी, लिंबू आंबट फळ, पदार्थ यांच सेवन करू नका, मुळा व हे आंबट पदार्थ एकत्र खाल्ल्यास अपचन होऊ शकते, पोटदुखी होते.

कडू कारल्याचे सेवन

कारल्याची भाजी बरेचजणांना आवडते पानात कारल्याची भाजी असल्यास त्यासोबत मुळा खाऊ नका. कारल व मुळा एकत्र खाल्ल्यास हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते.

About the author

Shyam Hajare

Add Comment

Click here to post a comment