Home » लग्नानंतर नर्सिंगचे शिक्षण पूर्ण करत तिने मुलालाही डॉक्टर बनवून दाखवलं
काय चाललंय? खास तुमच्यासाठी!

लग्नानंतर नर्सिंगचे शिक्षण पूर्ण करत तिने मुलालाही डॉक्टर बनवून दाखवलं

कोणतीतरी काहीतरी स्वप्न पाहावं आणि ते पूर्ण व्हावं, यासारखं सुख नसतं. अनेकदा आपलं एखादं स्वप्न असतं,आणि ते आपल्याला पूर्ण करता येत नाही,पण ते स्वप्न आपले स्वप्न पूर्ण करतात. आता हेच पहा नर्स असणाऱ्या स्मिता याचं एक स्वप्न त्यांच्या मुलाने पूर्ण केला. स्मिता यांनी त्यांच्या मुलाला डॉक्टर बनविले आहे. आज पारिचारिका दिनानिमित्त स्मिता संजय चव्हाण यांची ही यशोगाथा.स्मिता यांच्या माहेरची आर्थिक स्थिती बेताची होती, पण स्मिता अभ्यासात हुशार होत्या.

त्यांना उच्च शिक्षण घेण्याची फार अपेक्षा होती. पण १२ वी नंतर त्यांच्या घरच्यांनी त्यांचा विवाह संजय चव्हाण यांच्याशी लावून दिला. स्मिता यांच्या लग्नानंतर अवघ्या काही दिवसांत त्यांच्या आई- वडिलांचे अवघ्या निधन झाले. स्मिता आणि त्यांचे पती सोलपुरात राहत, संजय यांना देखील नोकरी नव्हती, त्यांना नोकरी मिळे पर्यंत स्मिता यांनी पडेल ते काम केले. संजय यांना नोकरी मिळाली, स्मिता यांनी नर्सिंगचे शिक्षण घेण्याचे ठरविले.

त्यांनी शासकीय महाविद्यालयातून जीएनएम कोर्सला अॅडमिशन घेतले, या दरम्यान त्यांना मूल झाले, त्यांचे नाव निखिल ठेवले. निखिलला पाळणाघरात ठेवून स्मिता यांनी नोकरी आणि शिक्षण पूर्ण केले. २००४ मध्ये स्मिता यांना उत्तम नोकरी लागली. त्या कामाला जाऊ लागल्या.

तेथे त्या अनेक डॉक्टर यांच्या सोबत काम करत, तेव्हाच त्यांनी मनात निश्चय केला , त्यांच्या मुलाला म्हणजे निखिला त्या डॉक्टर करतील. स्मिता यांचे पती संजय आणि स्मिता यांनी मुलाला डॉक्टर करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्याचे ठरविले. निखिल देखील अभ्यासात हुशार निघाला.

निखिलसाठी त्यांनी कोणत्याच गोष्टीकडे पाहिले नाही, अफाट कष्ट केले, अखेर निखिलला उत्तम मार्क्स मिळाले आणि त्याला शासकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश मिळाला. लग्नानंतर स्वताचे शिक्षणपूर्ण करून, रुग्ण सेवा करून स्वताच्या मुलाला देखील डॉक्टर बनविले. आज निखिल मेडिकलच्या तिसऱ्या वर्षाला आहे.