Home » मल्हाराव होळकरांनी अशी केली होती अहिल्यादेवी होळकरांची पारख
खास किस्से खास तुमच्यासाठी!

मल्हाराव होळकरांनी अशी केली होती अहिल्यादेवी होळकरांची पारख


अहिल्याबाई होळकर हे नाव फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण देशांत त्यांची एक वेगळी ओळख आहे. स्त्रीकडे किती दूरदृष्टी असते हे आपल्याला अहिल्याबाई यांच्याकडे पाहिल्यावर समजतं. चौडी येथील शिंदे कुटुंबात अहिल्याबाई यांचा जन्म झाला.

अहिल्याबाई यांचे वडील माणकोजी हे पुढारलेल्या विचारांचे होते. त्यांनी अहिल्याबाई यांना शिक्षण दिले. तसेच इतर कला यामध्ये देखील पारंगत केले. मल्हारराव होळकर एका दौऱ्यासाठी चालले होते. ते चौडी येथे मुक्कामाला थांबले होते. तेव्हा एका आठ वर्षांची मुलगी अनेकांशी प्रेमाने वागत आहे. त्यांना मदत करत आहे. हे पाहून मल्हारराव यांचा खूप कौतुक वाटले. तिच्यातील करूणाभाव त्यांना खूप भावला.

मल्हाररावांनी अहिल्याबाई यांचे वडील माणकोजी यांच्याकडे अहिल्यादेवी यांचा हात स्वताच्या मुलांसाठी मागितला. खंडेराव आणि अहिल्याबाई यांचा विवाह झाला. अहिल्याबाई बुद्धीने प्रचंड कुशाग्र होत्या. त्या त्यांच्या सासऱ्यांना देखील त्यांच्या राज्यकारभारात मदत करत. खंडेराव यांना लढाईमध्ये वीर मरण आले. अहिल्याबाई यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला होता,मल्हाररावांनी त्यांना थांबविले.

अहिल्यादेवी यांनी देशभरातील कित्येक मंदिरांचा जिर्णोद्धार केला. वाटसरू यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून पाणपोई उभारल्या. शेतकऱ्यांसाठी अनेक नवीन कायदे केले. अहिल्याबाई स्वता जातीपाती यांच्या भिंती मानत नसतं. राज्यांत अनेक ठिकाणी विहिरी बांधल्या.अनेक धर्मशाळा, आश्रयालये उभारली.