Home » आपलं अहमदनगर आज 532 वर्षांचं झालंय…शहराच्या नावामागचा इतिहास रंजक आहेय
खास तुमच्यासाठी!

आपलं अहमदनगर आज 532 वर्षांचं झालंय…शहराच्या नावामागचा इतिहास रंजक आहेय

प्रत्येक शहर आणि त्यांचा एक वेगळा इतिहास असतो. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण काही शहरांचे बर्थडे पण असतात. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन, पण आपल्या महाराष्ट्रातील एका शहराचा आज वाढदिवस आहे. अहमदनगर आज तब्बल 532 वर्षांचं झालं आहे.

अहमदनगर नावाशी त्या शहराचा इतिहास जोडला गेला आहे. अहमद निजामशाह याने जहांगिर खान जो बिदरचा सेनापती यांचा पराभव केला. अहमद निजामशाहला या गोष्टीचा प्रचंड आनंद झाला. त्याने तेथेच म्हणजेच भिंगार जवळ भुईकोट किल्ला बांधण्यास घेतला. तो दिवस म्हणजे 28 मे 1490 या दिवसाला अहमदनगर शहरांचा स्थापना मानला जातो. पुढे भुईकोट किल्याच्या आजूबाजूस वस्ती उभी राहिली आणि तेथे एक शहर उभा राहिले, हे शहर म्हणजे अहमदनगर. (Ahmednagar Sthapna Din)

अहमद निजामशहा यांच्या नावावरून या शहराला नाव मिळाले अहमदनगर. सुलतान चाँद बिबीचा इतिहास देखील या शहराने पाहिला. निजामशाह, मोगल, मराठे, पेशवाई, इंग्रज अशा सर्व सत्ता या शहराने अनुभवल्या. अहमदनगरमधील अनेक वास्तु अजून देखील त्यांच्या ज्वलंत इतिहाची आठवण करून देतात. यामध्ये चाँदबिबीचा महाल, दमडी मशिद, कोटला 12 इमाम, अहमदनगरचा भुईकोट किल्ला ही ठिकाणे आहेत.

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा देखील टिळकांनी सर्वात प्रथम अहमदनगरमध्ये चे दिली. अहमदनगरच्या बाबतीत एक ओळ खूप प्रसिद्ध आहे. नगरच्या मातीत काहीही टाका ते उगवून येतं. अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमदनगर शहर आणि जिल्हा यांचा इतिहास हा फार मोठा आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की अहमदनगर 532 वर्षांचं झालं पण अजून देखील या शहरांचा म्हणावा तितका विकास झालेला नाही. अजून देखील या शहराला उत्तम रस्त्यांची, शहरनियोजनाची आणि विकांसाची अपेक्षा आहे.