Home » घरात असतांना खुद्द देवेंद्र फडणवीस अमृतांना सॉरी म्हणतात मग गोष्ट कुठलीही असो
खास तुमच्यासाठी!

घरात असतांना खुद्द देवेंद्र फडणवीस अमृतांना सॉरी म्हणतात मग गोष्ट कुठलीही असो

अमृता फडणवीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी होयं. अमृता नेहमी चर्चेत असतात. कधी त्यांच्या वादग्रस्त ट्विटसाठी तर कधी त्यांच्या नवीन अल्बमसाठी. सध्या देखील त्या चर्चेत आहेत ते त्यांच्या गाण्यासाठी. अमृता यांना त्यांच्या गाण्यासाठी मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागत आहे, पण देवेंद्र फडणवीस यांना अमृता यांच्या गाण्याबद्दल काय वाटते? हे  देखील तितकेच महत्वाचे आहे. अमृता यांना लोकमत आयोजित एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या नात्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा अमृता यांनी त्यांच्या आणि देवेंद्र फडणवीस  यांच्या नात्याचा उलगडा केला.

मी कसे कपडे परिधान करते, माझे केस कसे आहेत, किंवा मी जाड झाले आहे की बारीक या गोष्टीचा देवेंद्र यांना कधीच फरक पडत नाही. ते मला कधीच याविषयी बोलत देखील नाहीत. ते फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम करतात.

देवेंद्र अतिशय रोमॅंटिक आहेत. त्यांनी मला आयुष्यात आमची मुलगी दिविजा हे सर्वात अनमोल गिफ्ट दिले आहे. देवेंद्र अतिशय हळवे आहेत. एकदा आम्ही थ्री इडीयट सिनेमा पाहत होतो, देवेंद्र अचानक रडू लागले. ते अतिशय मृदु मनाचे आहेत. ते स्त्रियांचा आदर करतात.

देवेंद्र यांनी मला कधीच गाणे गाण्यापासून अडविले नाही. ते नेहमी माझ्या पाठीशी खंबीर उभे असतात. त्यांना गाणं गाणे ही कला आवडते आणि ते त्यांचा आदर करतात. तुमच्या दोघांमध्ये भांडण किंवा वाद झाल्यानंतर पहिल्यांदा कोण सॉरी म्हणत, यावर अमृता म्हणतात देवेंद्र यांनाच सॉरी म्हणावं लागत. कारण पती नेहमीच पहिल्यांदा सॉरी बोलत असतात. घरात माझी सत्ता असते आणि मीच निर्णय घेत असते. अमृता म्हणतात मी जरी एका राजकारणी व्यक्तीची पत्नी असेले तरी मी एक स्वातंत्र्य व्यक्ती आहे, मला माझ्या स्वताच्या काही आवडी या-निवडी आणि छंद आहेत. गाणं हा माझा छंद आहे आणि मला तो जोपावासा वाटतो.