Home » भर सभेत अजान कानावर पडताच बाळासाहेबांनी विचारला एकच प्रश्न ‘औरंगाबाद की संभाजीनगर’
आपलं राजकारण खास तुमच्यासाठी!

भर सभेत अजान कानावर पडताच बाळासाहेबांनी विचारला एकच प्रश्न ‘औरंगाबाद की संभाजीनगर’


महाराष्ट्र आणि येथील राजकारण हे एक वेगळं समीकरण आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक विषय येतात आणि जातात आणि पुन्हा पुन्हा देखील येतात, आता हेच पहा मागील आठवड्यापासून राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा होणार होणार अशी चर्चा रंगली होती.

काल राज यांची सभा झाली आणि औरंगाबाद सह संपूर्ण राज्याला बाळासाहेब यांची आठवण झाली, गोष्ट आहे 2005 सालची काही महिन्यांपूर्वीच म्हणजेच 2004 साली महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सत्ता आली, मात्र औरंगाबादमध्ये मात्र सेनेची सत्ता होती. तब्बल 15 वर्ष सेना औरंगाबादमध्ये सत्तेत होती,पण आघाडीला आता सेनेची सत्ता घालवायची होती.

काहीही होवो सेनेला औरंगाबादेतून घालवायचे असे आघाडीच्या नेत्यांनी ठरविले होते. युतीच्या नेत्यांना देखील धाकधूक लागली होती, सत्ता टिकते की नाही, औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. ही सभा नक्की करिश्मा दाखविणार असा विश्वास आघाडीच्या नेत्यांना होता, ठरल्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांची सभा सुरू झालीम सभेला तुडुंब गर्दी होती, बाळासाहेब यांचे भाषण चांगलेच रंगात आले होते तेव्हा अजानचा भोंगा वाजू लागला.

त्या भोंग्यामुळे सर्वत्र एकच शांतता पसरली, बाळासाहेब देखील काही क्षण थांबले, अजान संपताच बाळासाहेबांनी त्यांच्या स्वताच्या स्टाइलने विचारले,एक हात कमरेवर ठेवला आणि एक बोट हवेत दाखवत एक प्रश्न विचारला, यासाठी मी तुम्हाला विचारतो तुम्हाला औरंगाबाद हवं आहे की संभाजीनगर?