Home » भारतातील या कंपनीत सिक्युरिटी गार्डपासून, शिपाईपर्यंत सगळेच आहेत करोडपती
खास तुमच्यासाठी!

भारतातील या कंपनीत सिक्युरिटी गार्डपासून, शिपाईपर्यंत सगळेच आहेत करोडपती

गुजरात मधील असं शहर जेथील करोडपती देखील करतात शिपाई सिक्युरिटी गार्डच काम. माणसांकडे जेव्हा चार पैसे येतात तेव्हा माणूस ते पैसे एकतर व्यवसायात गुंतवितो किंवा मग बँकेत ठेवतो, आपल्या महाराष्ट्रात देखील अनेकांना जमीन विकून किंवा एखाद्या सरकरी कामांसाठी जागा दिल्यानंतर चिक्कार पैसे मिळतात, मग असे गुंठा मंत्री हे पैसे महागड्या गाड्या आणि त्यांच्या आवडी-निवडी पूर्ण करण्यासाठी वापरतात, निवांत राहतात, काम धंदा काही करत नाहीत.

पण गुजरातमधील साणंद असं एक गावं आहे जेथील अनेक लोक करोंडपती आहेत, तरी देखील शिपाई, सिक्युरिटी गार्ड असे काम करतात. आणि महिन्यांकाठी १२००० ते १५००० हजार कमावतात. आता तुम्ही विचार कराल, अशी काय गरज आहे, त्यांना १२००० -१५००० हजारांसाठी काम करण्याची.

पण स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी हे लोक काम करतात. टाटा मोटारर्सने त्यांचा पश्चिम बंगाल मधील प्रकल्प हलविला आणि तो प्रकल्प साणंद ला हलविला. सुरुवातीला शेतकऱ्यांनी या गोष्टीला विरोध केला, पण सरकारने प्रकल्पाचे महत्व पटवून दिले, आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे जाहीर केले.

साणंद एक ऑटोमोबाईल हब म्हणून उदयाला आले, येथील रविराज फोइल्स लिमिटेड कंपनीमधील ३०० पैकी १५० कर्मचारी हे करोडपती आहेत. तरी देखील हे कर्मचारी शिपाई, सिक्युरिटी गार्ड यासारखे काम करतात.

या कर्मचाऱ्यांना जमीन अधिग्रणामधून मोठी रक्कम मिळाली आहे, यांनी हे सारे पैसे सोने, बँक यामध्ये हे पैसे गुंतविले आहेत. आधी साणंदमध्ये केवळ ९ बँका होत्या, आता तब्बल २५ बँका असून ५६ शाखा आहेत. तब्बल ३ हजार करोंड इतके रुपये जमा आहेत. लाखों रुपये व्याज मिळून देखील स्वताला कामात गुंतवणून ठेवणाऱ्या या गुजराती माणसाचे कौतुक करावे तितके कमी आहे.