सध्याच्या काळात सच्चे कार्यकर्ते मिळायला भाग्य लागतं, आधीचे कार्यकर्ते हे एकनिष्ट होते, नेत्यांना देखील त्यांची जाणीव होती पण काळ बदलला आणि सर्व काही बदलून गेलं.शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आणि शिवसेना ठाण्यात ज्यांनी घरा-घरात आणि मना-मनात पोहचवली ते धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर एक चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटांचे नाव आहे धर्मवीर.
या चित्रपटांतील अनेक डायलॉग आणि विडियो व्हायरलं होत आहेत. एक फोटो तो म्हणजे राज ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यातील हॉस्पिटलमधील शेवटचा संवाद, त्यांची शेवटची भेट आणि चित्रपटांतील हाच असलेला सीन. या फोटोमध्ये पाहून असे वाटत आहे की आनंद दिघे जणू राज यांना म्हणत आहेत, हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची.
राज ठाकरे आनंद दिघे यांना भेटायला गेले होते, तेव्हाचा हा विडियो आहे. ट्विटरवर मनसे रीपोर्ट नावाने एक अकाऊंट आहे, त्यावरून हाफोटो शेअर करण्यात आला आहे. फोटोला ओळी आहेत, हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची- धर्मवीर.