Home » भारताने अमेरिकेला वेड्यात काढलं आणि अणुचाचणी घेऊन पराक्रम केला
खास तुमच्यासाठी!

भारताने अमेरिकेला वेड्यात काढलं आणि अणुचाचणी घेऊन पराक्रम केला

संपूर्ण जगात ज्याच्याकडे सर्वाधिक शस्त्र आणि सैन्य तो सर्वाधिक ताकदवान मानला जातो. भारताने देखील पोखरण अणुचाचणी केली आणि अमेरिकेसह संपूर्ण जगाला दखल घ्यावि लागली .भारत जगात ताकदवान देशाच्या ओळीत जाऊन बसला. भारताने घेतलेल्या अणुचाचणीची अमेरिकेसह कोणत्याच देशाला या मिशनची कल्पना नव्हती. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयए सॅटलाईटच्या माध्यमातून जगभरातील देशांवर लक्ष ठेवत असते, कोणता देश काय करतो, कोणत्या हालचाली करतो, कोणी अणूचाचणी घेत आहे का? पण पोकरण अणुचाचणीची अमेरिकेला देखील भणक लागली नाही.

अणुचाचणी घेण्याचा प्लॅन जबरदस्त तयार करण्यात आला होता. फक्त रात्रीच्या वेळी काम केले जात, सर्व वैज्ञानिक हे सैनिकी वेशात असतं. राजस्थान सारख्या अतिउष्ण भागात दिवसभर नियोजन आणि रात्रभर काम असे केले जात.

हे मिशन इतके गोपनीय होते की भारतीय सैनिकांना देखील यांची माहिती नव्हती. या मिशनकी सर्व चर्चा देखील कोड वापरुन केली जात. या मिशनचे नेतृत्व आर. चिदंबरम आणि डॉ. अब्दुल कलाम यांनी केले होते. त्यावेळी पंतप्रधान होते अटलबिहारी वाजपेयी. जेव्हा अनुचाचणी घेतली गेली, तेव्हा अमेरिकेला देखील आश्चर्याचा धक्का बसला.

११ मे १९९८ रोजी भारताने दुसरी यशस्वी अणुचाचणी घेऊन अमेरिका, पाकिस्तानसह संपूर्ण जगाला हादरून सोडले होते. भारताच्या या चाचणीमुळे देशांच्या प्रगतीला एक नवीन उभारी मिळाली. संपूर्ण जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलून गेला.

११ मे ते १३ मे १९९८ या तीन दिवसांमध्ये भारताने ५ स्फोट करून अणुचाचण्या घेतल्या. १९९८ साली वाजपेयी पंतप्रधान झाले, त्यांनी लगेच दोन दिवसात कलाम आणि चिदंबर यांची भेट घेतली आणि प्रश्न विचारला अनू चाचणी घेण्याची तयारी किती दिवसात होऊ शकते, कलाम म्हणाले तुम्ही संमती द्या, पुढच्या ३० दिवसांत चाचणी होऊन जाईल. भारताने जेव्हा ही अनू चाचणी घेतली तेव्हा भारताला फार त्रास झाला. अनेक देशांना भारतावर निर्बंध घातले, पण भारत मात्र मागे हटला नाही. त्या स्फोटाने जगासमोर एक शक्तीशाली भारत उभा केला.