Home » भारतीयांना वेड लावणारे आफ्रिकन भाऊ-बहीण हिंदीतच रील्स का बनवतात?
खास तुमच्यासाठी!

भारतीयांना वेड लावणारे आफ्रिकन भाऊ-बहीण हिंदीतच रील्स का बनवतात?

भारतातील बॉलीवुड जगभरात फेमस आहे. अनेक देशांत हिंदी चित्रपट आणि गाणी प्रचंड गाजतात. अनेकदा आपल्याला वाटतं अरे आपल्या बॉलीवुडच्या गाण्यांना बाहेरच्या देशांत कोण विचारणार? पण तसं नसून बॉलीवुडचे जगभरात चाहते आहेत. आता हेच पहा आफ्रिकेतील टांझानिया (Tanzania) देशातील दोन बहीण भाऊ त्यांच्या हिंदी रील्समुळे संपूर्ण देशांत व्हायरलं झाले आहेत. करोडो भारतीय त्यांचे चाहते झाले आहेत.

निमा पॉल (Nima Paul) आणि तिचा भाऊ किली पॉल (Kili Paul) अनेक हिंदी गाण्यांवर रील्स बनवितात त्यामुळे त्यांचे सोशल मिडियावर करोडो फॅन्स आहेत. किलीने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे , मला अगदी लहानपणी पासून हिंदी चित्रपट आणि गाणी यांचे वेड होते. त्या गाण्याचा अर्थ जरी समजत नसला तरी त्याचं संगीत आणि सुर मनाला भिडतात.

किमीची बहीण निमा म्हणते मला हिंदी कळत नाही पण काही शब्दांचे अर्थ माहीत आहे, जसं की दिल आणि पाणी. किली हा गोरखा आहे. ते गाई पाळतात आणि जंगलात राहतात. ते मासाई समुदायाचे आहेत. किली सांगतो माझ्याकडे एक मोबाईल आहे, मी त्यावर अनेक रील्स पाहत असतो. असेच एकदा मला तेरी मेरी गल्लां होगी मशहूर हे गाणं प्रचंड आवडलं मला त्यांचा थोडाफार अर्थ समजला पण त्याचं संगीत मला प्रचंड आवडलं. मी त्यावर एक रील्स बनविलं आणि ते जगभरात अनेकांना आवडलं. मग मी असेच रील्स बनविण्यास सुरुवात केली, माझी बहीण निमाला देखील माझ्यासोबत घेतले.

तिला देखील एक मोबाईल घेऊन दिला तिने देखील अनेक रील्स पाहिले, आमच्या गावात वीज नाही मी दुसऱ्या ठिकाणी जाऊन मोबाइल चार्ज करतो. निमा म्हणते सुरवातीला मला मोबाईल समोर फार अवघडलेपण वाटायचे पण दादाने माझी भीती घालविली. दादाने मला सांगितले आपण प्रसिद्ध आहोत, लोकांना आपले रील्स आवडत आहे. आम्हाला प्रसिद्धी मिळत आहे हे पाहून फार आनंद वाटतो. रील्समुळे (Hindi Reels) आता काही कामे देखील मिळू लागली आहेत. त्यातून चार पैसे मिळतात. असे किली सांगतो. आता आजूबाजूचे लोक देखील आम्हाला मदत करतात. लूट गये हे किलीचं आवडतं गाणं आहे. तो भारतातील चाहत्यांना सांगतो आणखी नवीन विडियो आणि डान्स पाहण्यासाठी सज्ज रहा.