Home » एके काळी अनेक शिक्षकांनी राजीनामे देऊन एसटी महामंडळाची नोकरी धरली होती
खास तुमच्यासाठी!

एके काळी अनेक शिक्षकांनी राजीनामे देऊन एसटी महामंडळाची नोकरी धरली होती

एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास हे ब्रीदवाक्य घेऊन गेल्या 70 वर्षाहून अधिक काळ एसटी प्रवासी वाहतूक देत आहे. गाव- खेडी आणि शहर यांना जोडणार सर्वात मजुबत आणि एकमेव दुवा असेल तर ती आहे एसटी. दिवाळीच्या मुहूर्तावर एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यासाठी संपावर गेले आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकच गदारोळ झाला. तुटपुंजा पगार,अपुऱ्या सुविधा अशा अनेक मागण्यासाठी एसटी कर्मचारी संपावर  गेले आहेत.  एसटीमुळे अनेकांची शिक्षणे पूर्ण झाली. शिक्षणाच्या जोरावर अनेकांनी चांगल्या नोकऱ्या मिळवल्या स्वताच्या गाड्या घेतल्या पण एसटी कर्मचारी मात्र तेथेच राहिला. कामाच्या अनिश्चित वेळा, जादाच्या ड्यूट्या त्यामुळे एक वेळी गुरं राखू पण एसटी महामंडळात नोकरी नको असं आजचे युवक म्हणत आहेत,  पण एक काळ असा होता जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांची चांदी होती.

“तेव्हा कामगारांच्या समस्या मांडण्यासाठी इटंक आणि कामगार अशा दोन युनियन होत्या. पण तेव्हा असे संप किंवा आंदोलन होत नसतं.”

एसटी महामंडळात नोकरी मिळावी यासाठी अनेक शिक्षकांनी देखील त्यांच्या नोकऱ्या सोडून महामंडळाची नोकरी पकडली होती. 1952 साली नगर-पुणे ही पहिली बस सेवा सुरू झाली. या एसटीचे पहिले वाहक म्हणजेच कंडक्टर साहेबराव सोनजी पाटील  एका मुलाखतीत म्हणतात की जेव्हा पहिली एसटी सुरू झाली होती, तेव्हा कामाचा इतका लोढ नव्हता. तेव्हा दोन-तीन एसटी होत्या. कंडक्टरला गावात एक वेगळाच मान होता. आम्ही जेव्हा मुक्कामी एसटी एखाद्या गावात घेऊन जायचो तेव्हा तिथले स्थानिक पुढारी आमचा चांगला पाहुणचार करायचे. तेव्हा कामगारांच्या समस्या मांडण्यासाठी इटंक आणि कामगार अशा दोन युनियन होत्या. पण तेव्हा असे संप किंवा आंदोलन होत नसतं. आंदोलन केले तरी बदली संदर्भात. तेव्हाच्या महागाईच्या तुलनेत पगार खूप चांगला होता, त्यामुळे अनेकांना एसटी महामंडळात काम करावेस वाटतं, पण आता महागाई प्रचंड वाढली आहे, पण पगार मात्र तितकेच आहे. त्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी तेव्हा चांदी होती. पण आता मात्र तसे राहिले नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या मुख्य गरजा देखील भागविल्या जात नाहीत. इतका कमी पगार दिला जातो. त्यामुळे एसटीचा तो सुवर्ण काळ पुन्हा येणार का?  हा देखील महत्वाचा प्रश्न आहे.