सीडीएस ( Chief of army staff )बिपिन रावत यांचे अपघातात निधन झाले, त्यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला आहे पण त्यांचे पद अधिक काळ रिक्त ठेवता येणार नाही. त्यांच्या जागी सध्याचे लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मनोज नरवणे भारताचे 28 वे लष्कर प्रमुख आहेत. जर त्यांची नियुक्ती झाली तर ते दुसरे सीडी एस असतील. लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांचे सुरवातीचे शिक्षण पुण्यातीलज्ञान प्रबोधिनी शाळेत झाले आहे. त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून लष्कराचं शिक्षण घेतलं आहे. ते देहारादुन येथील इंडियन मिलिटरी अॅकडेमीचे माजी विद्यार्थी आहेत (Manoj Mukund Naravane).
इंदौरच्या देवी अहिल्या देवी विद्यापीठातून त्यांनी संरक्षण आणि व्यवस्थापन अभ्यासात एमफील केलं आहे. मनोज यांचे वडील देखील लष्करात होते.मनोज यांच्या पत्नी शिक्षिका आहेत. त्यांना दोन मुली देखील आहेत. बिपिन रावत यांच्या सोबत देखील नरवणे यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे लष्करात सध्या काय सुरू आहे. लष्कराचे पुढील धोरणं काय आहे हे माहीत आहे.
मनोज नरवणे यांनी त्यांच्या शालेय जीवनातील अनेक भन्नाट किस्से एका मुलाखतीत सांगितले आहेत. ज्ञानप्रबोधिनी ही पुण्यातील एक नावाजलेली शाळा आहे. नरवणे यांचे वडील देखील सैन्यात होते. त्यांच्या सतत बदल्या होत, त्यामुळे मनोज यांचे देखील अनेक ठिकाणी शिक्षण झाले, मुलांच्या शिक्षणासाठी नरवणे यांचे वडील शेवटी पुण्यात आले. त्यांनी पुण्यातील अनेक भारी शाळा शोधल्या, त्यांना ज्ञानप्रबोधिनी बेस्ट वाटली. त्यांनी मनोज यांना म्हणून ज्ञानप्रबोधिनीत घातले.
तिथे अभ्यासासोबत इतर अनेक कला शिकवल्या जात. नरवणे सांगतात मी शाळेच्या लेझिम पथकात देखील होतो, गणपती समोर आम्ही देखील लेझिम खेळायचो. शाळेने मला खूप गोष्टी शिकवल्या. प्रामाणिकपणा हा सर्वात महत्वाचा गुण शाळेने मला शिकवला. जेव्हा आमच्या परीक्षा होत तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला पेपर वाटून ते निघून जात, आम्हाला कोणी परीक्षक देखील नव्हते. आम्ही अगदी प्रामाणिकपणे पेपर लिहीत असू. त्यामुळे शाळेय जीवनापासून प्रामाणिकपणा हा गुण मला शाळेकडून मिळाला आहे.