Home » काशीतील पुरोहितांनी मराठ्यांना रोखलं नसतं तर आज ज्ञानवापी मशिद उभीच दिसली नसती
खास किस्से खास तुमच्यासाठी!

काशीतील पुरोहितांनी मराठ्यांना रोखलं नसतं तर आज ज्ञानवापी मशिद उभीच दिसली नसती

संपूर्णजग युद्ध, इंधन आणि अन्न सुरक्षा या सारख्या विषयांमुळे चिंतेत आहे. भारतात मात्र मंदिर की मशिद हा विषय महत्वाचा ठरत आहे. काशीतील ज्ञानवापी मशिदीत हिंदू देवी-देवतांच्या मूर्तीचे अवशेष सापडले. संपूर्ण देशांत एकच खळबळ उडाली. अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद पुन्हा सुरू झाला.

३०० वर्षांपूर्वी हा मुद्दा जेव्हा सुरू झाला होता, तेव्हा मराठ्यांनी हा विषय संपवला असता, पण काशीतील पुरोहित मध्ये आले आणि ज्ञानवापी मशिद उभी राहिली. त्याचं झालं असं १८ एप्रिल १६५९ साली औरंगजेबाने हिंदू मंदिरे पाडून, मशिदी उभे करण्याचे आदेश दिले. ही गोष्ट मराठा सरदार मल्हारराव होळकरांना समजली.

हिंदू मंदिरांची होत असलेली छेडछाड मल्हारावांना काही पटली नाही. मुघलांना वचक बसावा आणि मंदिराची होत असलेली छेडछाड थांबावी म्हणून मल्हारराव २० हजार सैन्य घेऊन काशीकडे रवाना झाले होते. मल्हाररावांनी ठरविले होते की काही होवो, औरंगजेबाला धडा शिकवायचाचं.

१७५१ मध्ये रोजी मल्हाराव २० हजार मराठी सैन्य घेऊन काशीत पोहचले. जिथं ते मंदिर पाडून मशिद बांधली गेली होती, ती मशिद पाडण्याची खुनगाठ मल्हाररावांनी बांधली होती. मल्हार रावांनी ठरविले होते, पाडलेली सारी मंदिरे पुन्हा दुरुस्त करायची. औरंगजेबाला धडा देखील शिकवायचा.

काय करायचं, कसं आक्रमण करायचं हे सर्व ठरलं. पण अचानक काशीतील पुरोहित मध्ये आले आणि मल्हारावांना त्यांची मोहीम मागे घ्यावी लागली. पुरोहितांचे म्हणणे होते, तुम्ही मशिद पाडून, मंदिर पुन्हा उभे करालं ,पण तुम्ही त्या नंतर दिल्लीला परताल त्यानंतर आम्हाला त्रास सहन करावा लागेल. आम्ही हात जोडतो पण तुम्ही ही मोहीम मागे घ्या.

मल्हाररावांनी पुरोहितांची ती विनंती मान्य केली आणि ते त्यांचे २० हजार सैन्य घेऊन परतले. जर तेव्हाच पुरोहितांनी मल्हाररावांना रोखले नसते तर आज तेथे हिंदू मंदिर असले असते.आजचा हा वाद निर्माण झाला नसता. एक वेगळा इतिहास लिहिला गेला असता.