Home » पुण्यातील मित्रांनी फ्लॅटमध्ये सुरू केला व्यवसाय, आज करोडो कमावतात
खास तुमच्यासाठी!

पुण्यातील मित्रांनी फ्लॅटमध्ये सुरू केला व्यवसाय, आज करोडो कमावतात


एमआयटी पुणे येथील फार्मसी कॉलेजमध्ये सुरज चौधरी फार्मसी विषय शिकत होता. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, दाढी करण्यासाठी जे रेजर वापरले जाते ते अतिशय महाग आहे. आपण काहीतरी करायला हवे. सूरजने त्यांच्या डोक्यात जे विचार चालले आहेत, ते त्यांनी त्यांच्या मित्राला म्हणजेच मिहिर वैद्यला सांगितले, मिहिर पेशाने कम्प्युटर इंजिनियर आहे. दोघांनी या समस्येवर काम करायला सुरुवात केली.

रेजर च्या किंमती इतक्या का आहेत, हे शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले, या क्षेत्रात काही मोजक्याच ब्रॅंडची मक्तेदारी आहे. आपण काहीतरी करायला हवे. 2015 साली त्यांनी एका छोट्या फ्लॅटमध्ये ब्लेड अँड बाथ हा रेजर बनविणारा ब्रॅंड सुरू केला. त्या नंतर त्यांचा मित्र हरिश अमृतकर देखील त्यांच्या टीममध्ये सामील झाला. तीन वर्षात त्यांनी अनेक ग्राहकांचा अभ्यास केला. मोठा डेटा जमा केला. अनेक फीडबॅक जमा केले. 2018 पुन्हा ज्लेड (zlade) नावाचा नवीन ब्रॅंड लॉंच केला. 2015- 2017 हा काळ या तिघांसाठी अतिशय खडतर होता.

2017 साली स्टार्टअप इंडिया नावाचा एक कार्यक्रम केंद्र सरकारने सुरू केला यामध्ये त्यांच्या ज्लेड ब्रॅंडला (zlade germany razors) परवानगी मिळाली. ज्लेड माफक किंमतीत दाढी करण्यासाठी जरूरी असलेले साहित्य उपलब्ध करून देत आहे. सामान्य भारतीय नागरिकांना असे वाटते की चांगल्या ब्रॅंडचे रेजर महाग असतात. कारण महागडे रेजर उत्पादित करणाऱ्या फार कमी कंपन्या आहेत. ज्या कंपन्या स्वस्तात रेजर देतात त्यांची क्वालिटी उत्तम नसते. त्यामुळे लोक ब्रॅंड सोडून दुसऱ्या गोष्टी घेण्यास घाबरतात. ज्लेडने दोन प्रकारचे रेजर बाजरात आणले आहेत. चार ब्लेड आणि सहा ब्लेड. तसेच त्यांचे रेजर हे रासायनिक मुक्त शेविंग देतात. शेविंग जेल हे देखील अल्कोहल फ्री आहे.