Home » फुकटात नाही भाषण.. नितीन गडकरींना युट्यूब महिन्याला लाखो रुपये देतंय
खास तुमच्यासाठी!

फुकटात नाही भाषण.. नितीन गडकरींना युट्यूब महिन्याला लाखो रुपये देतंय

गडकरी म्हणतात मी जे भाषण करतो ना, त्यासाठी मला युट्यूब देखील पैसे देतं. मला महिन्याकाठी युट्यूबच्या माध्यमातून ४ लाख रुपये मिळतात.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा आज ६५ वाढदिवस आहे. आज आपण त्यांच्याविषयी एक वेगळी गोष्ट जाणून घेणार आहोत. सोशल मीडिया उदयास आला आणि अनेकांना व्यवसायाच्या अनेक संधी मिळाल्या. अनेक ब्लॉगर, यूट्यूबरर्स आपण पाहत आहोत. ते लाखों रुपये कमावतात, पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील एक प्रसिद्ध यूट्यूबर (YouTube) आहेत.

आता तुम्ही विचार कराल हे काय नवीन. हो नितीन गडकरी यूट्यूबर आहेत आणि त्यांचे लाखों सबस्क्रायबर आहेत. नितीन गडकरी यांनी स्वता एका कार्यक्रमात त्यांच्या युट्यूब कमाईबाबत सांगितले. गडकरी म्हणतात मी जे भाषण करतो ना, त्यासाठी मला युट्यूब देखील पैसे देतं. मला महिन्याकाठी युट्यूबच्या माध्यमातून ४ लाख रुपये मिळतात. त्यांनी सर्व हे पैसे सामजिक कामांसाठी वापरले. कोविड काळात त्याचा वापर मदतीसाठी केला, असा देखील खुलासा त्यांनी केला.

गडकरी म्हणतात मला कोविड काळाच्या आधी अजिबात सोशल मिडियाची सवय नव्हती. मी ते वापरण्याचा कंटाळा करायचो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला याबाबत आग्रह करायचे. पण कोविड काळात मला ते शिकावे लागले. कोविड काळात मी ९५० हून अधिक विडियो कॉन्फरन्स घेतल्या. विविध देशांत मला चर्चा करण्यासाठी बोलविले जात. तेथील चर्चा सत्रे देखील मी यूट्यूबवर टाकायला सुरुवात केली. आता सोशल मीडिया वापरण्याची सवय झाली आहे. त्यामुळे युट्यूबमुळे माझे कमाईचे एक नवीन साधन सुरू झाले आहे. त्यामुळे नितीन गडकरी देखील एक प्रसिद्ध यूट्यूबर आहेत. ते यातून महिन्यांकाठी लाखों रुपये कमावतात.