Home » आज सर्वात भ्रष्ट IAS अधिकारी पूजा सिंघल यांचा लिम्का बुक मध्ये रेकॉर्ड होता
खास तुमच्यासाठी!

आज सर्वात भ्रष्ट IAS अधिकारी पूजा सिंघल यांचा लिम्का बुक मध्ये रेकॉर्ड होता

भ्रष्टाचार ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला यशाच्या शिखरावरुन अवघ्या काही मिनिटात खाली आणू शकते. एखादा व्यक्ती दिवसरात्र अभ्यास करून, मेहनत करून क्लास वन अधिकारी बनतो, पण भराष्ट्राचार रुपी विचार डोक्यात शिरतो आणि त्या व्यक्तीचं करियर अवघ्या काही वेळेत संपते.

2000 साली एका मुलीचं नाव लिम्का बुक मध्ये नोंदणविलं गेलं कारण अवघ्या 22 व्या वर्षी ती मुलगी आयएएस अधिकारी बनली. संपूर्ण देशाला तिचा आणि तीच्या हुशारिचा हेवा वाटला. पण हीच मुलगी पुढे जाऊन सर्वात मोठी भ्रष्टाचारी अधिकारी बनली. ही कहाणी आहे, आयएएस अधिकारी पुजा सिंघल यांची. पूजा सिंघल यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. पूजा यांच्याकडून तब्बल 19 कोटी इतकी संपत्ती जप्त केली आहे.

पूजा यांनी भाजपा सरकारमध्ये अनेक महत्वाची पदांवर काम केले आहे. कृषि,पर्यटन या विषयांवर काम केले. पूजा सिंघल यांच्या भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत, मनरेगा योजनेअंतर्गत 6 कोटीचा गैरव्यवहार केला आहे. अजून एका मनरेगा योजनेत 16 कोटीचा गैरव्यवहार केला आहे.

पूजा सिंघल यांचा काही दिवसांपूर्वी अमित शहा यांच्या सोबत असलेला एक फोटो व्हायरलं झाला होता, या फोटोमध्ये त्या अमित शहा यांच्या कानात काही तरी कुजबुजत होत्या. त्या नंतर अवघ्या दोन दिवसांत पूजा यांच्यावर ईडीने ही कारवाई केली. पूजा यांचे दोन लग्न झाली आहेत. त्यांचे पहिले लग्न एका आयएएस अधिकाऱ्यांशी झाले होते. तर दुसरे लग्न हे अभिषेक झा यांच्याशी झाले होते. अभिषेक हे एका मोठ्या हॉस्पिटलचे व्यवस्थापक आहेत.