अत्यंत हलाखीची परिस्थिती असूनही मेहनितीच्या जोरावर मात करून प्रमोद चौगुले याने यशाला गवसणी घातलीये. राज्यभरातून त्याच्या या यशाच कौतुक होतंय. MPSC परीक्षेत ६१२ गुण मिळालेल्या प्रमोद चौगुले हा राज्यातील प्रथम विद्यार्थी आहे.
महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा २०२१ च्या परीक्षार्थींच्या अखेर आयोगाने घेऊन हा कार्यक्रम आज सांयकाळी पूर्ण केला आहे. त्यानंतर काही तासातच या परीक्षेचा निकाल समोर आला. पहिल्यांदाच मुलाखतीचा कार्यक्रम झाल्यानंतर इतक्या तत्परतेने हा निकाल लागण्याची हि वेळ होती.
मुलाखतीनंतर काही वेळातच निकाल लागण्याची हि पहिलीच वेळ समजली आहे. एका बाजूला राज्य सेवा आयोगाने हा नवीन विक्रम केला तर दुसरीकडे परीक्षेत ६१२ गुण मिळवून प्रमोद बाळासाहेब चौगुले हा राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळाल्याची बातमी समोर आली.
२०१५ पासूनच प्रमोदने राज्य सेवा आयोग आणि इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. अनेकदा यश आणि अपयश पचवत या तरुणाने अखेर या वर्षी घवघवीत यश संपादन केल आहे. मागच्या परीक्षेतही त्याचा नंबर एकाच मार्काने हुकला होता, परंतु या वेळी थेट राज्यात प्रथम येण्याची कामगिरी त्याने केली आहे.
प्रमोद म्हणतो, “माझा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. करोना काळात सांगलीत पूर येऊन गेला होता. घरात कुटुंबातील सगळे करोना पॉझिटिव्ह आलेले असताना मी एकता अभ्यास करत होतो”.
तुटक्या अर्धा एकराच्या शेतीवर असलेल्या कुटुंबात, प्रमोद चौगुले याचे वडील हे एक साधारण टेम्पो चालक आहे आणि आई देखील घरकाम सांभाळून हातभार लावायचा म्हणून शिवणकाम करते. इतक्या प्रतिकूल आणि हलाकीच्या परिस्थितीत प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर प्रमोदने आभाळाएव्हढ्या यशाला गवसणी घातली आहे.