घरात प्रचंड दारिद्र्य,वडील एम.आय.डी.सीत कामाला, अगदी तुटपुंजा पगार, आजच्या काळात खोटं वाटेल पण विजेअभावी दिव्यांच्या प्रकाशात अभ्यास करुन मुरगुडच्या प्रतिकने संशोधनासाठी तब्बल ७७ लाखांची शिष्यवृत्ती मिळवली आहे.
प्रतिकला परदेशात उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती मिळाली आहे. कागल तालुक्यातील कुरकली येथील सर्वसामान्य कुटुंबात प्रतीक दत्तात्रय कांबळे यांचा जन्म झाला. प्रतीक बालपणीपासून अभ्यासात प्रचंड हुशार होता. प्रचंड ध्यास, अभ्यासतील प्रगती या जोरावर त्याने ऑस्ट्रेलिया नॅशनल विद्यापीठात प्रवेश मिळवला आहे.
कुरकली येथील प्राथमिक शाळेत प्रतीकचे प्राथमिक शिक्षण झाले. प्रतीकची हुशारी पाहून त्यांच्या शिक्षकांनी त्याला नवोदयसाठी पाठविले. नवोदयमध्ये देखील त्यांची निवड झाली. १२ वी पर्यतचे शिक्षण नवोदयमध्ये केले. पुढे इचलकरंजी येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंग केले. यांच गुणांच्या आधारे आता तो ऑस्ट्रेलिया नॅशनल विद्यापीठात मास्टर्स करण्यासाठी जाणार आहे.
तेथे तो रोबॅटीक विषयात संशोधन करणार आहे. त्याला अनेक परदेशी विद्यापीठातून संधी चालून आल्या होत्या पण त्याने ऑस्ट्रेलिया नॅशनल विद्यापीठाची निवड केली. त्याला आता ऑस्ट्रेलियांचा विमान प्रवास करण्यासाठी तब्बल दोन लाख रुपये खर्च येणार आहे.तो आता त्यासाठी प्रयत्न करत आहे. समाजातील दानशूर व्यक्तीनी त्याला मदत करावी.