भारतात हिंदी पाठोपाठ जर कोणते चित्रपट जास्त चालत असतील तर ते दक्षिणेतील चित्रपट. वेड लावणारं संगीत, जबरदस्त अॅक्शन सीन, हीरो -हिरोईनचा असणारा साधेपणा आणि खिळवून ठेवणारं कथानक यामुळे दक्षिणेतील म्हणजेच टॉलीवुडमधील सिनेमे अधिक चालतात.
तुम्ही जर नीट पाहिले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते, टॉलीवुडमधील बहुतांशी चित्रपट हे हिंदीमध्ये रिमेक केले जातात किंवा डब केले जातात. सध्या असाच पुष्पा द राईज हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. चित्रपटांतील एकसे बढकर एक संवाद, उत्तम आणि वेड लावणारी गाणी यामुळे पुष्पा गाजत आहे.
अल्लू अर्जुनची जबरदस्त अॅक्शन यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या चित्रपटांतील श्रीवल्ली हे गाणं प्रचंड गाजत आहे. या गाण्यांचे प्रत्येक भाषेत रिमेक आले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी मराठीत देखील एक भन्नाट आवाजात श्रीवल्ली गाण्यांचा रिमेक आला होता
या गाण्याला 10 लाखांहून अधिक व्यूज मिळाले होते. आता पुन्हा एकदा श्रीवल्ली गाण्यांचा मराठील एक रिमेक आला आहे. हे गाणे पुण्याचे गाणारे पोलिस म्हणून प्रसिद्ध असलेले आतिष खराडे यांनी गायलं आहे. याआधी त्यांनी मनिके मागे हिते या श्रीलंकन गाण्यांचा मराठी रिमेक केला होता. तो देखील प्रचंड व्हायरलं झाला होत.
आता ते पुन्हा एकदा एक मराठी रिमके घेऊन आले आहेत. हे रिमेक गाणं त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे. त्यांचा आवाज अनेकदा लोकांना आवडला आहे. पण मराठी भाषेत या गाण्यांचा रिमेक लोकांना आश्चर्यचकित करीत आहे. मात्र त्यांच्या गोड गळ्यातील गाण्याने सर्वांना भुरळ पाडली आहे.
ते त्यांचे काम करून वेळ काढून त्यांचा छंद जोपासत आहे ही एक विशेषबाब आहे. लोकांचा या गाण्याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे.