Home » UPSCमध्ये महाराष्ट्रात पहिल्या आलेल्या प्रियवंदाने घसघशीत पगारांच्या नोकरीवर पाणी सोडले होते
खास तुमच्यासाठी! झाल कि व्हायरल!

UPSCमध्ये महाराष्ट्रात पहिल्या आलेल्या प्रियवंदाने घसघशीत पगारांच्या नोकरीवर पाणी सोडले होते

आज यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. देशांत आणि राज्यांत दोन्ही ठिकाणी मुलीनी बाजी मारली आहे. महाराष्ट्रात प्रियवंदा महाडदळकर हिने पहिला क्रमांक पटकविला आहे. प्रियंकाचा देशांत 13 वा क्रमांक आला आहे. प्रियवंदा मुळची कोकणातील रत्नागिरी येथील आहे. तीचे संपूर्ण शिक्षण मुंबई आणि बेंगलोर येथे झाले आहे.

मुंबईत इंजिनिअरिंग केल्यानंतर तिने बेंगलोर येथील आयआयएम मधून एमबीए केले. त्या नंतर तिने Investment Banking क्षेत्रात एकूण सहा वर्ष नोकरी केली. तेथे तिला अगदी उत्तम पगार होता. सर्व काही उत्तम होते पण तीचे मन मात्र त्यात रमले नाही. तिला अगदी बालपणी पासून आयएएस व्हायचं होतं.

त्यामुळे तिने यूपीएससी करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी अनेकदा तिने ठरविले होते की आपण यूपीएससी करायचे पण ते शक्य झाले नाही. अखेर तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला 2020 साली तिने यूपीएससीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. प्रियवंदा सांगते यूपीएससी परीक्षेचा आवाका फार मोठा आहे. सतत अभ्यास आणि भरपूर सराव यामुळे हे यश मिळवणे शक्य झाले आहे.

उत्तरे लिहिताना अतिशय मुद्देसूतपणा लागतो. प्रियवंदा तीच्या यशाचे श्रेय तीचे घरचे पती आणि सासरे यांना देते. प्रियवंदा म्हणते नोकरी सोडताना अनेक प्रश्न मनात होते स्थिरस्थावर सोडणे सोप्पे नव्हते पण त्याहून अधिक माझे बालपणीचे स्वप्न मला अधिक खुणावत होते.