महाराज यशवंतराव होळकर म्हणजे मराठा साम्राज्याच्या धगधगीत इतिहासातील शूर. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या ज्वलंत मशालीला भारतभर पसरविणाऱ्या मराठा राज्यांपैकी एक. इंग्रज ही भारताला लागलेली कीड आहे आणि ती काढणं ही आपली जबाबदारी आहे ह्या भावनेतून महाराज यशवंत होळकरांनी दौलत राव सिंधिया सारख्या काही बड्या साम्राज्यांसोबत हात मिळवून “इस्ट इंडिया कंपनीचं” नष्ट करून इंग्रजांना हाकलून लावण्याचं स्वप्न पाहिलं होत.
हि गोष्ट आहे तेव्हाची ज्यावेळी पेशावर पासून तंजावर पर्यंत मराठी घोड्यांचा संचार होता. मुघल, आदिलशाही, हैदराबादचा निजाम असे सगळे शत्रू मराठ्यांना टरकून राहायचे. पण, पेशवाई मध्ये अनागोंदी झाली, आपापसातील भांडणे यामुळे मराठा सत्ता मोडकळीस आली. सरदारांमधील एकोपा कमी होत गेला. तरीही, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणारे एक वीर असेही होऊन गेले ज्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्या परिस्थितीतही इंग्रजांच्या काळजात दहशत निर्माण केली होती. त्यांच नाव होत महाराजा यशवंतराव होळकर. यशवंतराव हे तुकोजीराव होळकर यांचे पुत्र होते.
पुण्यात जन्म झालेल्या यशवंतरावांनी आपल्या कर्तुत्वाचा विस्तार संपूर्ण जगभर केला. होळकर साम्राज्य ज्याला आज आपण इंदोर म्हणून ओळखतो. हे त्याच संस्थानाचे राजे होते. मराठा साम्राज्य एकत्रं आलं तर अखंड हिंदुस्थानावर राज्य करु शकतं असा द्रुढ विश्वास असणाऱ्या यशवंत रावांनी इंग्रजांना तर अक्षरशः सळो की पळो करुन सोडलं होतं. यशवंतरावांच्या दरबारात कुठल्याच इंग्रज अधिकाऱ्याला गादीवर बसण्याची संमती नव्हती. कुठलाही इंग्रज अधिकारी आलाच तर त्याला सरळ खाली जमिनीवर बसावं लागायचं.
इंग्रज ही भारताला लागलेली कीड आहे आणि ती काढणं ही आपली जबाबदारी आहे ह्या भावनेतून पुढे महाराज यशवंत होळकरांनी दौलत राव सिंधिया सारख्या काही बड्या साम्राज्यांसोबत हात मिळवून “इस्ट इंडिया कंपनीचं” मुळासकट उखडून काढण्याची मोहीम सुरु केली. इंग्रज अधिकाऱ्यांनी सगळे उपाय वापरून यशवंत रावांना थांबवण्या प्रयत्न केला. पण महाराजांना रोखू शकणं शक्य नव्हतं आणि ही गोष्टं इस्ट इंडिया कंपनीचा मुख्य अधिकारी मॉन्सेनला सुद्धा ठाऊक होती. मॉन्सेन इतक्या भल्यामोठ्या कंपनीचा त्यावेळी अधिकारी असूनही महाराज यशवंतराव म्हंटलं तरी दचकून उठायचा.
दौलतराव सिंधिया सोबत मिळून यशवंतरावांनी जवळ जवळ इस्ट इंडिया कंपनी बरखास्त केली होती पण शेवटच्या घटिकेला दौलतराव सिंधिया फितूर झाले आणि त्यांनी गुपित पत्रं मॉन्सेनच्या हातात दिली. त्यानंतर बरीच वर्षं महाराज यशवंतराव आपल्या लोकांना एकजूट करत राहिले आणि एक दिवस असा आला की ही इंग्रज हुकुमत त्यांच्या समोर झुकली आणि त्यांना इस्ट इंडिया कंपनी मध्ये समान अधिकार दिले गेले. ज्यातून त्यांनी रयतेच्या हिताचे निर्णय घेतले. जर यशवंतराव होळकरांना इतर मराठेशाहीच्या सरदारांनी मदत केली तर इंग्रजांचा नामोनिशान भारतातून केव्हाच मिटून गेला असता आणि माराठेसाहीचा डंका लाल किल्ल्यावर देखील वाजला असता. पुढची दीडशे वर्षे भारताला पारतंत्र्याची गुलामगिरी कधी भोगायची गरजच पडली नसती.