Home » राज ठाकरे यांच्या सोबत देखील कॉलेजमध्ये रॅगिंग झालं होतं, मग बाळासाहेबांनी केल असं काही की ..
आपलं राजकारण खास किस्से

राज ठाकरे यांच्या सोबत देखील कॉलेजमध्ये रॅगिंग झालं होतं, मग बाळासाहेबांनी केल असं काही की ..


रॅगिंग हा शब्द कॉलेजमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाला माहीत असतो. काहीनी ते अनूभवलेले असते तर काही दुसऱ्याच्या तोंडून किस्से जाणून घेतलेले असतात. आक्रमक दिसणारे राज ठाकरे देखील रॅगिंगचे बळी पडले होते. राज ठाकरे यांनी मुंबईतील प्रसिद्ध अशा जे. जे. कॉलेज ऑफ आर्टस मध्ये पहिल्या वर्षाला अॅडमिशन घेतले होते. त्यावेळेसचा हा किस्सा आहे.

राज आता जरी आक्रमक वाटत असले तरी कॉलेजमध्ये प्रचंड शांत होते. थोडे लाजरे-बुजरे होते.राज यांच्या सोबत देखील रॅगिंग झाले पण त्यांनी कोणाला बोलून दाखविले नाही,पण बाळासाहेबांना कोठून तरी ही गोष्ट समजली की राज यांच्या सोबत रॅगिंग झाले आहे.

राज त्यांच्या काकाच्या अतिशय जवळचे होते. त्यांचा राजवर प्रचंड जीव होता.त्यांना या गोष्टीचा प्रचंड राग आला. त्यांनी रॅगिंग केलेल्या मुलांना मातोश्रीवर बोलावून घेतले. त्या मुलांना चांगलेच दटावले. राज समोर त्या मुलांना शिक्षा देखील दिली. त्या मुलांना कदाचित माहीत नसावे की त्यांनी एक राजकीय पार्श्वभूमीअसलेल्या मुलांचे रॅगिंग केले आहे. त्याला धक्का-बुक्की देखील केली होती.

राज यांचे प्राथमिक शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात झाले होते. राज यांचे आई- वडील जरी दादरला राहत असले तरी राज मात्र त्यांच्या काकांच्या घरी म्हणजे मातोश्रीवर राहत असतं. फक्त शनिवार- रविवारी ते त्यांच्या घरी येत असत. राज घरी जरी खोट्या करत असले तरी त्यांचे मित्र म्हणतात राज कॉलेजमध्ये खूप शांत होता. सहसा तो कोणत्या स्पर्धेत देखील भाग घेत नसे, त्यांचा खोडकरपणा घरात चालायचा.