महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसं पहायला गेलं तर एक भारदस्त व्यक्तीमहत्व आहे. फडणवीसांना उत्तम शरीर लाभलेले आहे, काल एका सभेत महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील फडणवीस यांच्या वजनाची खिल्ली उडविली.
फडणवीस यांनी तरी देखील त्यांचे वजन बरेच कमी केले आहे, पण फडणवीस खाण्याचे मात्र तितकेच शौकीन आहेत. त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी मागील काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात देवेंद्र यांचा एक किस्सा सांगितला होता, अमृता म्हणाल्या होत्या की देवेंद्र एका पंक्तीत किंवा एका बैठकीत किमान ३५ पूरणपोळ्या आणि पातेलेभर तूप खाऊ शकतात.
अमृता यांना देखील देवेंद्र यांना ३५ पोळ्या करून द्यायच्या आहेत, आणि त्यांना खाताना पहायचे आहे. अमृता यांनी जेव्हा देवेंद्र यांचा हा किस्सा सांगितला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात यांची चर्चा झाली होती. मग खुद्द फडणवीस यांना या घटनेमागील सत्य विचारण्यात आले. तेव्हा फडणवीस यांनी मात्र एक वेगळाच खुलासा केला. फडणवीस म्हणतात मी ३५ पोळ्या नव्हे तर ८ ते १० पोळ्या खाल्ल्या होत्या. आता ते देखील शक्य नाही.
फडणवीस सांगतात आमच्या लग्नात मी आणि अमृता जेवायला बसलो होतो, माझ्या मित्रांनी अमृताची फिरकी घेण्याचे ठरविले, माझा एक मित्र गंमतीने अमृताला म्हणाला देवेंद्र यांना पुरणपोळी फार आवडते. ते एका बैठकीत ३५ पोळ्या आणि पातेले भर तूप खाऊ शकतात. अमृताला हे खरं वाटलं असावं.
एकदा मी खरंच मित्रांसोबत पैंज लावली होती पण मी ८ पोळ्या खाल्या होत्या. आता तर ते देखील शक्य नाही. देवेंद्र यांच्या मित्राने घेतलेली फिरकी अमुता यांना खरी वाटली असावी.