सुप्रिया सुळे शरद पवार यांची एकलुती एक मुलगी. शरद पवार म्हणजे महाराष्ट्रातील एक मुरब्बी व्यक्तिमहत्व. पवार आणि ठाकरे कुटुंबाचे कौटुंबिक संबंध संपूर्ण महाराष्ट्रास माहीत आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची चांगली मैत्री होती. राजकारणाच्या वेळीस राजकारण आणि कौटुंबिक संबंध वेगळे.
“तिच्या विरोधात उमेदवार उभा केला नसता. असं बाळासाहेब पवारांना म्हणाले. त्या नंतर बाळासाहेबांनी भाजपाला देखील ताकीद दिली, सुप्रियाच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही. सुप्रियाला मी लहानपणी पासून ओळखतो”.
हे धोरण पवार आणि ठाकरे या दोघांनी पाळले. त्यामुळे पवार आणि ठाकरे कुटुंबाचे संबंध खूप चांगले आहेत. अनेक कौटुंबिक कार्यक्रमात पवार आणि ठाकरे कुटुंबीय एकत्र दिसतात. ठाकरे आणि पवार यांच्या कुटुंबाचे हितसंबंध आणखीच घट्ट झाले ते सुप्रिया यांच्यामुळे, बाळासाहेब ठाकरे यांच्या भाच्यास म्हणजेच सदानंद सुळे यांच्याची सुप्रिया यांचा विवाह झाला आहे. म्हणजेच काय सुप्रिया सुळे या बाळासाहेब ठाकरे यांच्या सुनबाई आहेत. बाळासाहेब ठाकरे सुप्रिया सुळे यांना मुलीसमान मानत. जेव्हा सुप्रिया सुळे पहिल्यांदा राजकारणात उतरल्या तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सुप्रिया यांच्यासाठी भाजपला देखील राजी केले होते.
तो किस्सा असा आहे
2006 साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आपली मुलगी सुप्रिया सुळे हिस राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. पवारांच्या या घोषणे नंतर सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली. सुप्रिया शरद पवारांचा राजकीय वारसा पुढे चालविणार का? शरद पवार यांनी थेट घोषणा केली त्यामुळे बाळासाहेब ठाकरे मात्र चांगलेच नाराज झाले. त्यांनी शरद पवारांना चांगले खडे बोल सुनावले. बाळासाहेब ठाकरे यांना असे वाटले की शरद पवार त्यांना पूर्व कल्पना देतील, पण पवारांनी मात्र काहीच सांगितले नाही.
त्यामुळे बाळासाहेब पवारांना म्हणाले सुप्रियाला उमेदवारी देणार आहात याबाबत पूर्व कल्पना का दिली नाही? तिच्या विरोधात उमेदवार उभा केला नसता. असं बाळासाहेब पवारांना म्हणाले. त्या नंतर बाळासाहेबांनी भाजपाला देखील ताकीद दिली, सुप्रियाच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही. सुप्रियाला मी लहानपणी पासून ओळखतो.
ती सहा महिन्यांची असल्यापासून माझ्या मुलांबरोबर खेळली आहे, ती राज्यसभेत बिनविरोध जाणार नाही हे मी कसं पाहू शकतो. असं बाळासाहेब म्हणाले होते. अशा प्रकारे सुप्रिया सुळे बिनविरोध राज्यसभा खासदार बनल्या.