Home » भीमा या भाकरीने माझी भूक भागणार नाही, तुम्ही इतकं मोठं व्हावं, संपूर्ण दुनियेने तुमचा जयजयकार करावा
खास किस्से खास तुमच्यासाठी!

भीमा या भाकरीने माझी भूक भागणार नाही, तुम्ही इतकं मोठं व्हावं, संपूर्ण दुनियेने तुमचा जयजयकार करावा

आई-वडील आपल्या मुलांसाठी काय करू शकतात, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी आंबेडकर होयं. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे वडील रामजी यांच्यातील हा हदयद्रावक प्रसंग..

भीमराव म्हणजे बाबासाहेब दहावीला होते, त्यांची दहावीची परीक्षा तालुक्याच्या ठिकाणी होते, भीमराव यांना तालुक्याच्या ठिकाणी परीक्षेला जायचे होते, पण तिथे राहण्याची काहीच सोय नव्हती. तेव्हा भीमराव यांचे वडील रामजी त्यांना तालुक्याच्या ठिकाणी घेऊन राहिले. त्यांनी तेथे एक खोली भाड्याने केली.

भीमराव पेपरला जात असतं, ते पेपरवरुन परतत तो पर्यत रामजी त्यांच्यासाठी जेवण बनवून ठेवत. भीमराव जेवत ते रामजी यांना विचारत देखील तुम्ही कधी जेवणार आहात, रामजी त्यांना म्हणत भीमा तू जेव आधी मी जेवेलं नंतर. असेच दोन-तीन दिवस गेले भीमराव यांचे पेपर सुरू होते, रामजी रोज भीमराव यांना असंच सांगत, तू जेव आधी मी जेवेलं नंतर. एक दिवस भीमराव यांनी टोपल्यात पाहिले तर त्यांच्या जेवनानंतर टोपल्यात काहीच शिल्लक नव्हते.

भीमराव यांना धक्काच बसला, बाबा तुम्ही रोज उपाशी राहतात तुम्हाला भूक लागत नाही का? रामजी म्हणाले भीमा माझी भूक या भाकरीने मिटणार नाही. मला तुला इतकं मोठं झालेलं पहायचं आहे की मला माझी मान वरती करून तुला पाहावं लागेल. सर्वत्र तुझा जयजयकार व्हायला हवा. हे सर्व तुला शिक्षणामुळे शक्य होणार आहे.