राहुल गांधी म्हटल कि अनेकांना तो माणूस अभ्यासू वाटतो, तर काहींना पप्पू (Rahul Gandhi). त्यांच्यावर टीका करणाऱ्या मंडळीपेक्षा प्रेम करणारी लोकही कमी नाहीत. या न त्या कारणाने हा पठ्ठ्या ट्रोल होतो. पण तरीही मोदींना थेट प्रश्न करतोच. नुकतच राहुल गांधी यांचा मुंबईतील दौरा चर्चेत आलाय. आणि त्यामुळे २०१० चा एक किस्सा आठवला. जेव्हा शिवसेनेच्या धमकी वजा विरोधामुळे राहुल गांधींच्या त्यावेळच्या दौऱ्याने प्रचंड हवा केली होती. म्हटलं, यानिमित्ताने तो हि किस्सा तुम्हाला सांगावा इतकाच हा प्रयत्न.
गोष्ट आहे फेब्रुवारी २०१० मधली. त्यावेळचा राहुल गांधींचा एक वादळी ठरलेला दौरा होऊन गेलाय, जो तेव्हा त्यांनी केलेल्या थ्रिलिंग करामतींमुळे देशभर गाजला. त्यावेळी महाराष्ट्रात कॉंग्रेस चे सरकार होत पण दरारा मात्र बाळासाहेब आणि शिवसेनेचाच. आणि राहुल यांच्या दौर्याला शिवसेनेचा जोरदार विरोध होता. आता राहुल गांधींना विरोध करण्यासाठी फार मोठ्या करणाची गरज नव्हती. राहुल आताही सोना निकालूंगा, किंवा हिंदू हुं वगैरे बोलल्याने अनेकांना नाराज करतात. तर तेव्हाही त्यांनी एक वादाग्रस्थ स्टेटमेंट दिलेलं. ‘भारत हा सर्व भारतीयांचा आहे आणि २६/११ च्या वेळी बिहार आणि उत्तर प्रदेशातील कमांडो मुंबई वाचवण्यासाठी लढले’ अस त्यांनी बिहार मध्ये म्हटल होत. या वक्तव्याचा बाळासाहेबांनी सामनाच्या अग्रलेखातून खरपूस समाचार घेतला आणि देशभर त्या बातम्या पसरल्या. त्यामुळे, राहुल गांधी मुंबईत येतील तेव्हा या इटलीच्या युवराजाचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा आदेश सेनिकांना पोचला होता (Rahul Gandhi Mumbai Visit).
मुंबईचे शिवसेनिक प्रचंड आक्रमक, आणि सरकार कॉंग्रेसच. राज्यात एकूणच खळबळ सुरु झाली (Shivsena). पण कोणत्याही परीस्थितीत हा दौरा होणारच असा ठाम निश्चय करून बसलेल्या राहुल गांधींचा स्वाग सुद्धा कमी नव्हता. त्यासाठी सरकारने मुंबईत चोख बंदोबस्त करून ठेवला होता. अखेर ठरल्याप्रमाणे, ५ फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजेला विलेपार्ले मधील भाईदास हॉटेलातील सभागृहातून राहुल यांच्या दौऱ्याची सुरुवात झालीच. जुहू पासून राहुल गांधी हेलिकॉप्टर च्या मदतीने कार्यक्रमस्थळी पोचले होते.
पुढचा कार्यक्रम घाटकोपर ला होता, आणि जाण्यासाठी बाहेर रेडी असलेल्या हेलिकॉप्टर ला सोडून या राजकुमाराने वेगळंच काहीतरी केल. ज्याची पुढे स्थुती झाली पण तेव्हा तो ठार वेडेपणा होता. जबरदस्त पोलिसांचा ताफा, रुग्णवाहिका, बॉम्ब निकामी पथक या सगळ्यांना फाट्यावर मारून राहुल थेट अंधेरी स्टेशन वर पोचले. मुद्दाम रेल्वेस्टेशन वर गेल्यानंतर एटीएम मध्ये घुसून रेल्वेच्या तिकिटाचे पैसे काढले आणि तिकीट काउंटरला स्वतः जाऊन तिकीट घेतल. रांगेत उभ्या असलेल्या लोकांना आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता कि हा खरच राहुल गांधी आहे.
पुढचा थांबा होता शिवसेनेचा गढ दादर म्हणजे थेट वाघाच्या गुहेत राहुल यांनी स्वारी काढली होती. फर्स्ट क्लासमधून प्रवास करत राहुल गांधी मुंबईच्या सर्वसाधारण लोकांशी बोलत होते, त्यांचे प्रश्न ऐकत होते. पण यात एक गोष्ट झाली. ती म्हणजे राहुल गांधीनी ऐनवेळी केलेल्या या बदलामुळे तयारीत असलेल्या शिवसेनिकांची चांगली तारांबळ उडाली. आणि जिथे थोडेफार शिवसेनिक जमा झाले त्यांना पोलीस लगेच उचलत होते. दादरला आल्यावर राहुल गांधी रेल्वे चे धक्के खातच घाटकोपर गाठलं.
पण त्यांनी खाल्लेल्या धक्क्यांनी अक्ख्या देशाला त्यावेळी धक्के दिले होते. दररोज गर्दीचे धक्के खाणाऱ्या सामान्य मुंबईकराला या आश्चर्याच्या धक्क्याने भारावून सोडलं होत. राहुल गांधींच्या या यशस्वी आणि थ्रिल्लिंग मुंबई दौर्याची त्यावेळी देशभर चर्चा झाली. पण शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनाचा त्यांनी कुठे साधा उल्लेखही केला नव्हता. आताही राहुल गांधी मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर अशीच कमाल या दौर्यात करतील का हे हि महत्वाच असेल.