Home » ना अत्याधुनिक रडार, ना पुरेसा इंधनसाठा तरी देखील भारतीय नौदलाने पाकिस्तानच कंबरड मोडलं
खास किस्से

ना अत्याधुनिक रडार, ना पुरेसा इंधनसाठा तरी देखील भारतीय नौदलाने पाकिस्तानच कंबरड मोडलं


भारत आणि पाकिस्तान दोन शेजारील देश. पण या दोन्ही देशांचा इतिहास एकमेकांशी जोडला गेलेला आहे. कारण भारत आणि पाकिस्तान पूर्वी एकच अखंड भारत होते. फाळणी झाली पाकिस्तान भारता पासून वेगळा झाला. पाकिस्तानचे पहिल्यापासूनच भारताविषयी खुणशी धोरण आहे.

पाकिस्तान भारताला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाही. पण या सगळ्यांमध्ये सरते शेवटी पाकचे नुकसान होते. आज 4 डिसेंबर भारतात नौदल दिन म्हणून साजरा केला जातो, पण पाकिस्तानच्या इतिहासात आजचा दिवस काळा समजला जातो. कारण भारतासाठी पाकिस्तानने जो डाव रचला होता, तो त्यांच्या स्वतावरच उलटला होता.

भारतीय नौदलाने आजच्या दिवशी पाकिस्तानचे कराची बंदर उद्ध्वस्त केले होते. नौदलाचा हा पराक्रम दिन भारतीयांसाठी अभिमानस्पद आहे. 1971 साली भारत- पाक युद्ध झाले होते. हे युद्ध भारतासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. कारण या युद्धामुळे पाकिस्तानची फाळणी झाली होती.

पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते. तब्बल 90 हजार पाकिस्तानी सैनिक भारतापुढे शरण आले होते. पाकिस्तान भारताला त्रास देण्यासाठी नेहमीच जलमार्गाचा वापर करत आहे. मुंबईवर जो 26/11 हल्ला झाला तो देखील जलमार्गानेच केला होता. 1971 साली देखील पाकिस्तानने नौदलाच्या साह्याने भारताला जेरीस आणण्याची प्रयत्न केला होता, पण भारतीय नौदलाने हा डाव उधळून लावला.

त्यामुळे झालं असं कि, उलट पाकिस्तान नौदलाचे तीन महत्वाची तळ उद्ध्वस्त झाले. ज्यामुळे पाकिस्तानला भारतीय समुद्राच्या सीमा ओलांडण मुश्कील झालं. भारतीय नौदलाने पाकिस्तानचे कराची बंदर उडविण्याचा कट रचला. कारण पाकिस्तानचा सर्व तेल आणि इंधनसाठा हा या बंदरावर असतं. या मिशनला भारतीय नौदलाने नाव दिले ऑपरेशन ट्रायडेंट.

ऑपरेशन ट्रायडेंट यांची मोहीम आखली गेली खरी पण भारतीय सैन्याकडे ना कराचीपर्यत पोहचण्या इतका इंधन देखील नव्हते, तसेच अत्याधुनिक रडार देखील उपलब्ध नव्हते.या उलट पाकिस्तानकडे अत्याधुनिक अशी पीएनएस गाझी पाणबुडी होती, ही पाणबुडी बंगालच्या उपसागरात प्रवास करण्याच्या ताकदीची होती.

पीएनएस गाझीला भारतीय आयएनएस विक्रांतला नष्ट करण्यासाठी पाठविण्यात आले पण आयएनएस विक्रांतनेच पीएनएस गाझिला नष्ट केले. भारतीय नौदलाने अतिशय प्रतिकूल स्थितीत हे युद्ध जिंकले.त्यामुळे 4 डिसेंबर हा नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.

कराची तेल डेपो तब्बल 7 दिवस जळत होता
कराची हार्बर इंधन साठा भारतीय नौदलाने नष्ट केला. त्यामुळे पाकिस्तानचा कणा मोडला. कराची बंदरावर तेलाच्या टँकरच्या ज्वाला 60 किलोमीटर अंतरावर देखील दिसत होत्या. कराची डेपोची आग तब्बल 7 दिवस विजली नव्हती.