Home » या एका पट्ट्याने पाकिस्तानचे तब्बल 60 रणगाडे उध्वस्त केले होते..
Articles खास किस्से खास तुमच्यासाठी!

या एका पट्ट्याने पाकिस्तानचे तब्बल 60 रणगाडे उध्वस्त केले होते..


भारतात एकमेव असे संघटक असेल ज्यांच्यावर कधीही टीका होत नाही . ज्यांच्याबद्दल प्रत्येकांच्या मनात एक वेगळाच आदर असतो. हे संघटक म्हणजे इंडियन आर्मी म्हणजेच भारतीय सैनिक होय. भारतीय सैनिकांच्या अनेक यशोगाथा आज पर्यत आपण वाचल्या आहेत. जेव्हा आपण तो थरार वाचत असतो तेव्हा आपल्या अंगावर शहारे येतात. अशाच एका भारतीय वीर सैनिकांची यशोगाथा जाणून घेणार आहोत.

1965 च्या भारत- पाक युद्धात अनेक जवानांनी दाखवलेल्या शौर्य आणि पराक्रमामुळेच भारताला या युद्धात विजय मिळाला होता . या युद्धात हौतातम्य पत्कारणारे लेफ्टनंट कर्नल अर्देशिर बुर्जारजी तारापोर यांनी केलेले हा पराक्रम आणि साहस अतुलनीय आहे. लेप्टनंट कर्नल तारोपर यांनी छोट्या तुकडीचे नेतृत्व करत पाकिस्तान 60 टॅंकर उध्वस्त केले होते.

या बहादूरीमुळे विजयावर आपले शिक्कामोर्तब पण झाले पण या लढाईत अनेक भारतीय सैनिक शहीद झाले आहेत. तारापोर यांना हे धाडसाचे गुण त्यांच्या पूर्वजांकडून मिळाले आहेत. तारोपर यांच्या पूर्वजांनी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असताना पराक्रम केला. महाराजांनी खुश होऊन त्यांना 100 गावचे इनाम दिले होते. या शंभर गावात एक गाव होते तारापोर त्यावरून त्यांचे आडनाव पडले तारापोर .

तारापोर यांचा जन्म 18 ऑगस्ट 1923 रोजी मुंबईत झाला.ते अभ्यासात एकदम सर्वसाधारण होते.पण खेळाची प्रचंड आवड होती.पोहणे,टेनिस, आणि क्रिकेट यामध्ये ते तरबेज होते. त्यांना पूर्वपासून सैन्यात जायचे होते. त्याप्रमाणे ते सैन्यात गेले. त्यांच्या हुशारीने ते लवकरच लेफ्टनंट बनले. 1965 साली भारत- पाकिस्तान युद्ध सुरू झाले. त्यावेळी अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने होती. अमेरिकेने पाकिस्तानला त्यांच्या लष्करातील पॅटन टॅंक दिले होते. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याची हालचाल फार वाढली होती. एकवेळ तर अशी आली जेव्हा केवळ तारापोर आणि अवघे 17 सैनिक होते. कर्नल तारापोर यांच्याकडे सैन्यबल कमी होते.

भारतीय लष्कराने अधिकाऱ्यांनी त्यांच्या मदतीसाठी 43 टॅंकर तुकडी पाठवून दिली. पण हे अधिकचे सैन्यबळ तेथे पोहचलेच नाही त्यांना उशीर झाला. भारतीय सैन्याने तोपर्यत 60 टँकर नष्ट केले होते. आपण आपले नऊ टॅंकर गमावले पण त्याहून अधिक सैनिक देखील गमावले होते. कर्नल तारापोर देखील शहीद झाले. त्यांना वीर मरण आले. तारापोर स्वता जखमी झालेले होते पण त्यांनी त्या अवस्थेत कित्येक सैनिकांना मैदानातून दवाखान्यात पोहचवण्यास मदत केली. या लढाईत पाच अधिकारी आणि 64 सैनिक शहीद झाले होते. तारापोर या युद्धात शहीद झाले पण त्यांचा पराक्रम ते अजरामर करून गेले. तो कित्येक पिढ्यांना आदर्श असेल.