Home » यशवंतरावांमुळे त्यांच्या पत्नीची पहिली मकरसंक्रांत कारागृहात गेली होती
खास किस्से

यशवंतरावांमुळे त्यांच्या पत्नीची पहिली मकरसंक्रांत कारागृहात गेली होती

लग्न करीन तर देशभक्ताशी या मतांवर वेणुताई ठाम होत्या. 2 जून 19942 रोजी वेणु ताई यांचा यशवंतराव यांच्याशी विवाह झाला. वेणु ताई चव्हाणांच्या घरची लक्ष्मी बनून आल्या खऱ्या पण देशभक्ताशी लग्न करणे आणि ते निभावने इतके सोप्पे नव्हते. वेणु ताई आणि यशवंतराव यांचा विवाह जूनमध्ये झाला आणि ऑगस्टमध्ये गांधीजीनी भारत छोडो आंदोलन सुरू केले.

यशवंतराव त्यामध्ये सक्रिय होते. त्या कारणामुळे त्यांना अनेक वर्ष तुरुंगात हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. वेणुताई या यशवंतराव यांच्या खऱ्या अर्थाने अर्धांगिनी होत्या. यशवंतराव कोणताही निर्णय घेण्याअगोदर वेणु ताई यांच्याशी चर्चा करत त्यांना पूर्व कल्पना देत.

एवढं जरी असलं तरी वेणु ताई आणि यशवंत राव यांनी त्यांच्या जीवनात एक धोरण कायम राखलं ते म्हणजे, वेणु ताई घरातील सर्व निर्णय घेत पण यशवंतराव कधीच त्यामध्ये दखल अंदाजपणा करत नसतं. त्या प्रमाणेच वेणु ताई देखील यशवंतराव यांच्या राजकीय जीवनात आणि निर्णयात दखल देत नसतं. यशवंत राव दिल्लीत महाराष्ट्राची शान होते तर वेणु ताई आपल्या संस्कृतीचे प्रतीक होत्या.

त्यांच्या डोक्यारील पदर कधीच घसरला नाही. मुख्यमंत्र्याची पत्नी कशी असावी यांचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे वेणु ताई होयं. वेणु ताईचे संपूर्ण विश्व म्हणजे यशवंतराव हेच होते. साहेबांना कोणती पुस्तके हवी आहेत, त्यांचे कोणते कपडे त्यांना हवे आहेत, त्यांची ऑफिसची बॅग, त्यांचे गोळ्या औषधे या सर्वांची वेणुताई काळजी घेत. वेणु ताई यांना दागिन्यांचा कधीच मोह नव्हता. मात्र मंगळसूत्र त्या आवडीने आणि कटाक्षाने घालत.

घरात येणार -जाणारे या सर्वांची आपुलकीने त्या काळजी घेत. यशवंत राजकारणात जसे -जसे व्यस्त होऊ लागले तसे तसे वेणु ताई यांनी घराची संपूर्ण जबाबदारी स्वताच्या खांद्यावर घेतली. त्यांनी यशवंराव यांच्याकडे कधीच तक्रार देखील केली नाही. ते देतील तितक्या तुटपुंज्या पैशांत त्यांनी संसार चालविला. यशवंतराव यांचे अनेक परदेश दौरे देखील होतं पण वेणुताई कधीच त्यांच्या सोबत कोणत्याच दौऱ्यावर गेल्या नाहीत.

एकदा फक्त रशिया दौरा त्यांनी केला होता. यशवंतराव राजकारणात जितके यशस्वी झाले त्यामध्ये वेणुताई यांचा मोलाचा वाटा होता. वेणुताई यांनी कधी यशवंतराव यांच्या पदाचा गर्व केला नाही. त्या अतिशय साध्या होत्या. साधी राहणी उच्च विचारसरणी यांचे उत्तम उदाहरण म्हणजे वेणु ताई होयं.

आणि पहिली मकरसंक्रांत कारागृहात..
वेणु ताई यांना त्यांची पहिली मकरसंक्रांत नक्कीच कायमची लक्षात राहीलेली असेल, कारण 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंक मैदानावर माहात्मा गांधी यांनी करो किंवा मरो हा नारा दिला होता. यशवंतराव आणि त्यांचे सहकरी भूमिगत राहून ब्रिटिश सरकार विरोधात लढा देत होते. ही गोष्ट लक्षात घेत ब्रिटिश सरकारने 18 डिसेंबर 1942 रोजी क्रांतीसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण यांना पकडून देणाऱ्यांना 1000 चा इनाम जाहीर केला.

पण काही केल्या यशवंतराव काही सापडले नाही. ब्रिटिशांनी हे कारण पुढे करत वेणु ताई यांना अटक केले आणि कारागृहात टाकले. वेणु ताई यांना अटक झाली ती तारीख होती 13 जून 1943 आणि त्यांच्या दुसऱ्या दिवशीच मकर संक्रांत होती. वेणु ताई यांची लग्नानंतरची पहिलीच मकरसंक्रांत होती पण ती देखील त्यांना कारागृहात साजरी करावी लागली होती.

कारण त्यांनी एका क्रांतिकाऱ्यांशी लग्न केले होते. वेणु ताई आणि यशवंतराव यांचा विवाह 2 जून रोजीच झाला होता आणि त्याचं दिवशी म्हणजे 2 जून 1983 रोजी वेणु ताई यांचे निधन झाले. एरव्ही यशवंतराव यांच्या पावलावर पाऊल टाकणाऱ्या वेणु ताई मात्र एक पाऊल पुढे निघून गेल्या. कायमच्या दूरच्या प्रवासावर..