छत्रपती शाहू महाराज हे आधुनिक भारताचे राजे होते. त्यांच्याकडे उत्तम दूरदृष्टी होती. अंधश्रद्धेला ते अजिबात थारा देत नसत. त्यांचे अनेक निर्णय आज देखील विचार करायला भाग पडतात. छत्रपती शाहू यांच्यामुळे संपूर्ण देशांत प्राथमिक शिक्षण सक्तीचे झाले. ज्योतिष या सारख्या गोष्टीना महाराजचा खूप विरोध होता.
असाच एकदा महाराजांनी एका ज्योतिषाला धडा शिकवला होता. महाराजांच्या राजवाड्याजवळ त्यांची शेती होती. महाराज तेथे जाऊन शेती करत, जेवण करत,एक दिवस त्यांच्याकडे काही लोक आले आणि त्यांना म्हणाले महाराज कर्नाटकातील एक प्रसिद्ध ज्योतिष येणार आहेत, त्यांनी तुम्हाला भेटण्याचा आग्रह केला आहे.
महाराज म्हणाले माझा ज्योतिषावर विश्वास नाही. मी अशा लोकांना भेटत देखील नाही. असे स्पष्ट सांगितले. पण त्या लोकांनी मात्र खूप आग्रह केला, शेवटी महाराजांनी दोन दिवसांनंतर भेटण्याची वेळ दिली. पण तो ज्योतिषी मात्र दोन दिवसांनंतर आलाच नाही.
तो तीन दिवसानंतर आला. तो महाराज यांच्यापुढे उभा राहून रडायला लागला. महाराजांनी विचारले काय झाले रडायला, मी आलो, तुमच्या सैनिकांनी मला पकडलं, तुरुंगांमध्ये टाकलं, खूप मारलं , दोन वेळेचं जेवण देखील दिलं नाही. माझे फार फार हाल केले.
महाराज त्याला म्हणाले तू आला माझं भविष्य सांगायला, पण तुला माहीत आहे का ? तुझं भविष्य काय होतं. तुला तुझं भविष्य माहीत नाही आणि मला सांगायला निघायला भविष्य, मी आधुनिकेतचा विचार करतो. मी अशा भंपक गोष्टीवर विश्वास ठेवत नाही.