प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एक स्त्री असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासाठी या ओळी अगदी परफेक्ट मॅच होतात. उद्धव ठाकरे यांचा शपथविधी झाला आणि एक फोटो प्रचंड व्हायरलं झाला, तो फोटो रश्मी आणि उद्धव ठाकरे यांचा होता. रश्मी ठाकरे यांची शालिनता सर्व महाराष्ट्राला भावली. आज उद्धव-रश्मी ठाकरे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आज आपण त्यांची लव स्टोरी जाणून घेणार आहोत (Rashmi Uddhav Thackeray).
उद्धव ठाकरे यांनी जेव्हा पासून सेनेची जबाबदारी खांद्यावर तेव्हा पासून त्यांनी अनेक संकटाचा सामना केला. उद्धव यांच्यावर टीका देखील मोठ्या प्रमाणात झाली पण रश्मी यांनी उद्धव यांची खंबीर साथ दिली (Rashmi Thackeray). रश्मी या अतिशय शांत, सुस्वभावी आहेत. रश्मी यांचा जन्म डोंबिवलीत झाला. त्यांचे लग्नाच्या आधीचे आडनाव पाटणकर हे होते. त्यांचे वडील व्यवसायिक होते.
रश्मी यांनी 80 व्या दशकात वझे-केळकर कॉलेजमधून पदवी घेतली. त्या नंतर त्यांनी 1987 साली एलआयसीमध्ये नोकरी केली. तेथे त्या कंत्राटी स्वरूपात होत्या. एलआयसीमध्ये नोकरी करत असताना त्यांची ओळख जयवंती ठाकरे (Jaywanti Thackeray) यांच्याशी झाली. जयवंती म्हणजे राज ठाकरे यांची बहीण.
जयवंती यांनी उद्धव आणि रश्मी यांची भेट घडवून आणली. उद्धव ठाकरे त्यावेळी राजकारणात सक्रिय नव्हते. ते फोटोग्राफी करत, तसेच त्यांनी त्यांची जाहिरात कंपनी देखील सुरू केली होती. 13 डिसेंबर 1988 रोजी त्यांचा विवाह झाला. रश्मी नेहमी स्वताला कामात मग्न ठेवतात.
रश्मी त्यांचे सासू-सासरे आणि आई-वडील यांच्या अतिशय जवळ होत्या. कुटुंबाला सर्वात आधी स्थान देणे हे रश्मी यांना योग्य वाटते. रश्मी ठाकरे यांना शिवसैनिक मा साहेब 2 म्हणतात कारण रश्मी ठाकरे कोणतीच नकारात्मक गोष्ट उद्धव ठाकरे यांच्या पर्यत जाऊ देत नाहीत. त्यांचा राजकीय वावर जरी कमी असला तरी सेनेत काय चालू आहे, याकडे त्यांचे बारीक लक्ष असते.जेव्हा राज शिवसेना सोडून गेले तेव्हा देखील रश्मी यांनी उद्धव याची खूप साथ दिली.