इंग्रजांची राजवट जुमानायची नाही, आपण आपलं सरकारं बनवायचं. आपल्या देशात आपल्यावर येऊन दुसरं कोणी राज्य करेल हे यांना मान्य नव्हतं. या विचारातून क्रांतीसिंह नाना पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी 9 ऑगस्ट 1942 ते 15 ऑगस्ट 1942 या कालावधीत पत्री सरकार स्थापन केले.
या सरकारने नीरा काठ ते वारणा काठ या नद्यांच्या खोऱ्यातील सुमारे 650 गावात त्याचं सरकार स्थापन केलं होतं. हे सरकार म्हणजे क्रांतिकारी चळवळ होयं. संपूर्ण देशांत जेव्हा छोडो भारतची हाक दिली गेली तेव्हा देशभरात अनेक ठिकाणी मोठे लढे उभारले गेले त्यातील एक हा लढा हा होता.
या 650 गावात स्वराज्य घोषित केले होते. पत्री सरकारने स्वताचे ग्रामराज्य, न्यायदान मंडळे, स्थापन केली होते. सातारा आणि परिसरातील सर्व पोस्ट ऑफीस, डाक बंगले जाळले होते. ब्रिटिशांच्या पगारांच्या गाड्या लुटल्या आणि ते पैसे चळवळीसाठी वापरले जातं. इंग्रजांना खबरा देणाऱ्यांचे हे क्रांतीकारी दोन्ही पाय बांधत, त्यांच्या तळ पायांवर चुन्याचं पाणी टाकून, काठीचे तडाखे दिले जात आणि यालाच पत्री लावणं असं म्हणत.
यावरूनच या सरकारला पत्री सरकार म्हणतं. या पत्री सरकारने अनेक सावकारांना देखील धडा शिकवला होता. या पत्री सरकारवर ब्रिटिशांनी हजारोंची बक्षिसे लावली होती, पण कधीच हे क्रांतिकारी पकडले गेले नाहीत.
सामान्य नागरिकांनी देखील या पत्री सरकारला मदत केली. कारण हे पत्री सरकार सामान्य नागरिकांना देखील हवं होतं. कारण स्वातंत्र्यासाठी हे क्रांतिकारी एक आशेचा किरण होते. या पत्री सरकारचे कर्ता- धरता होते क्रांतीसिंह नाना पाटील.