Home » श्री देवीमुळे रुपाली गांगुली यांनी कित्येक दिवस केस धुतले नाहीत
खास किस्से मायानगरी

श्री देवीमुळे रुपाली गांगुली यांनी कित्येक दिवस केस धुतले नाहीत

स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका अनुपमा सध्या प्रसिद्धीच्या सर्वोच्च टोकावर आहे. मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. मालिकेत नायिकेच्या मुख्य भूमिकेत आहे, रुपाली गांगुली. रुपाली यांना यापूर्वी देखील आपण अनेक चित्रपटांत आणि मालिकेत पाहिले आहे.

रुपाली यांचे वडील अनिल गांगुली हे उत्तम फिल्ममेकर होते. त्यामुळे रुपाली यांनी अगदी लहानपणी पासून अनेक मोठ्या कलाकारांना अगदी जवळून पाहिले आले. रुपाली म्हणतात मी अगदी लहान असल्यापासून आमच्या घरी अनेक पार्ट्या होतं, अनेक कलाकार या पार्टी करता येत, त्यामुळे अगदी सर्व कलाकारांना मी जवळून पाहिले आहे.

पण मी कधीच कोणत्या कलाकारासोबत फोटो देखील काढत नसतं पण एकदा श्रीदेवी आमच्या येथे पार्टीला आल्या होत्या. मला त्या प्रचंड आवडत. मी त्यांना विनंती केली आपण एक फोटो काढूया. त्यांनी माझ्या डोक्यावरून आता फिरवला आणि माझ्या कपाळाचे चुंबन घेतले.

माझ्यासाठी साठी ही फार मोठी घटना होती. त्यांतर कित्येक दिवस मी माझे केस देखील धुतले नाहीत. कारण श्री देवी यांचा तो स्पर्श मला तसाच राहू द्यायचा होता. रुपाली यांनी आणखी एक आठवण सांगितली त्या म्हणाल्या श्री देवी जग सोडून जाण्याअगोदर अवघे काही दिवस आधी एक पुरस्कार वितरण सोहळ्यात भेटल्या होत्या, मी त्यांना जाऊन भेटले आणि माझी ओळख सांगितली त्यांनी लगेच मला ओळखले.

मी श्री देवी यांना एक विनंती केली आपण एक सेल्फी काढू शक्यतो का? श्री देवी यांनी होकार दिला. त्यानंतर श्री देवी यांना माझ्या करियर बद्दल सांगितले, तेव्हा श्री देवी अचानक म्हणाल्या मी तुला साराभाई वर्सेज़ साराभाई’ या मालिकेत पाहिले. तेव्हा रुपाली यांना प्रचंड आनंद झाला कारण आपण करत असलेल्या कामाची दखल आपली आवडती अभिनेत्री देखील घेत आहे. या गोष्टीचा आनंद वेगळा असतो.