Home » काँग्रेसच्या नादापायी बाळासाहेबांवर शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा द्यायची वेळ आलेली
आपलं राजकारण खास किस्से

काँग्रेसच्या नादापायी बाळासाहेबांवर शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा द्यायची वेळ आलेली


काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि राज्यात अनेक चर्चाना उधाण आले पण कॉंग्रेस आणि सेना यांचा हा घरोबा काही नवा नाही. याआधी बाळासाहेब ठाकरे असताना देखील सेनेने कॉंग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली.

कॉंग्रेसला जोरदार विरोध करणारा पक्ष अशी सेनेची ओळख होती. शिवसेना म्हणजे कॉंग्रेस विरोधी असे देखील समजले जातं पण 1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली, आणीबाणी लादल्यामुळे सर्वत्र एकच हाहाकार माजला होता. पण बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिला होता.

यानंतर 1977 साली बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा एकदा एका निवडणुकीत कॉंग्रेसला पाठिंबा दिला,पण नागरिकांना मात्र हा पाठिंबा काही रुचला नव्हता. सेनेचा मोठा पराभव झाला. तसं पाहिलं तर सेनेला हा मोठा धक्का होता. कॉंग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे असं झालं होतं. बाळासाहेब ठाकरे यांना देखील प्रचंड वाईट वाटलं. त्यांनी शिवाजी पार्कच्या एका रॅलीत राजीनामा देण्याची घोषणा केली. पण शिवसैनिकांना मात्र हे मान्य नव्हते.त्यांनी बाळासाहेब यांची समजूत काढली.

1971 साली कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले होते, एक इंदिरा गांधी यांचा गट आणि दूसरा कॉँग्रेस ओ, बाळासाहेब ठाकरे यांनी कॉंग्रेस ओ ला पाठिंबा दिला, निवडणुकीत तीन उमेदवार देखील उभे केले पण तीनही उमेदवार पडले. 1980 साली बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा कॉँग्रेसला पाठिंबा दिला, पण यावेळी मात्र एकही उमेदवार उभा केला नाही.

ए.आर. अंतुले यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी हा पाठिंबा दिला होता, कारण अंतुले आणि ठाकरे यांचे घनिष्ट संबंध होते. बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना देखील राष्ट्रपतीच्या निवडणुकीत पाठिंबा दिला होता. त्यामुळे कालची संजय राऊत याची भेट महत्वाची मानली जाते, कारण यापूर्वी देखील अनेकदा सेनेचा आणि कॉंग्रेसचा घरोबा दिसून आलेला आहे. कॉँग्रेस आणि शिवसेना हे समीकरण नवीन नाही. पण यावेळेस देखील हे समीकरण कितपत यशस्वी होते हे पाहणे महत्वाचे आहे.