Home » राजकारणात आल्यावर पहिलंच भाषण…अन् उद्धव ठाकरे तेही विसरले होते
खास किस्से

राजकारणात आल्यावर पहिलंच भाषण…अन् उद्धव ठाकरे तेही विसरले होते

उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा आपल्या शैलीत भाषण करणार म्हटल्यावर, शिवसैनिक आतुरतेने वाट बघून आहेत. शिवसेना पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे वडील बाळासाहेब ठाकरेंच्या शैलीत जेव्हा भाषण करतात त्यावेळी अख्ख शिवतीर्थ गाजवतात. समोर बसलेल्या शिवसैनिकांना त्यांच्या भाषणात बाळासाहेब समोर दिसतात. तोच ठाकरी बाणा आणि तीच बोलण्याची लकब सगळ अगदी हुबेहूब. भरगच्च सभेत टाळ्या आणि शिट्ट्यांच्या आवाजात समोरून लोकांचा प्रतिसाद कानावर पडतो. पण तुम्हाला माहितीये का एकेकाळी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत आल्यावर पहिलं वहिलं केलेलं भाषण पाठ करून देखील समोर बसलेल्या लोकांची गर्दी पाहून चक्क विसरले होते.

उद्धव आणि राज ठाकरे दोघेही वास्तविक पाहता एकाचवेळी राजकारणात आले होते. पण राज ठाकरे बाळासाहेबांच्या कायम सोबत आणि सुरुवातीपासून आघाडीवर असायचे. लक्षवेधी कामगिरी करून लोकप्रिय झाले, तर उद्धव ठाकरे पडद्यामागील राजकारणात अधिक सक्रीय होते. उद्धव यांनी राकारणात उघड इंट्री घेतली ती 1990 नंतरच. त्यावेळी उद्धव ठाकरे राजकारणातील डावपेचांसाठी नवीन होते आणि त्याची त्यांना फारशी आवडही नव्हती.

हि गोष्ट आहे 1991 मधली. ज्यावेळी उद्धव ठाकरेंना भाषणाची पहिल्यांदा आयती संधी चालून आली होती. ती म्हणजे राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या मोर्च्यामध्ये. नागपूर इथं हिवाळी अधिवेशन सुरु होत त्यामुळे राज ठाकरेंच्या बेरोजगार तरुणांच्या मोर्च्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तो प्रतिसाद मिळविण्यासाठी राज ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. आता नागपूरला मोर्चा विराट होणार हे स्पष्ट होतं. त्यासाठी राज ठाकरे मोर्च्याच्या आदल्याच दिवशी नागपूरला मुक्कामासाठी होते. त्याच रात्री राज यांना मातोश्रीवरून फोन आला कि मोर्च्यातील सार्वजनिक सभेला उद्धवला बोलू द्यावं असं सांगितलं गेलं.

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मोर्चा निघाला. ट्रकवर तात्पुरता बनवलेलं लाकडी फळ्यांच्या बनलेल्या व्यासपिठावर उद्धव ठाकरे बसले होते. सभा सुरु होताच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी घोषणा केली, आता उद्धव ठाकरे भाषण करतील. समोर मोर्चात नजर फिरवली अंदाजे 50 हजारांचा तो जमाव होता. याच सभेतील भाषण उद्धव ठाकरेंनी चक्क लिहून पाठ केलेलं होत. पण समोर बसलेला 50 हजारांचा जमाव पाहून उद्धव ठाकरेंना माईकसमोर उभ राहिल्यावर भाषणच आठवेना. भाषण करण्याची ती पहिलीच वेळ असल्याने उद्धव ठाकरे लिहून आणलेलं भाषण सोबत ठेवून होतेच, जेणेकरून लोकांना हे वाटू नये कि उद्धव ठाकरेंना काही येत नाही.

आता भाषण आठवत नाही म्हणून शांत बसणाऱ्यातील उद्धव ठाकरे नव्हते. भाषणाला उभे राहिल्यावर त्यांना जे सुचेल ते धडाधड बोलू लागले आणि समोर असलेल्या लोकांच्या टाळ्या सुरु झाल्या. आणि तेव्हा ठाकरेंचा कॉन्फीडन्स वाढला तो वाढतच गेला. उद्धव ठाकरेंच्या आजच्या सभातील भाषण पाहून कुणालाही या गोष्टीची जाणीवसुद्धा होणार नाही कि असाही क्षण पहिल्या वेळेस एका नवीन वाक्त्याप्रमाणे त्यांना आलाय ! पुढे उद्धव हे शिवसेनाप्रमुख झाल्यावर यांनी आपल्या भाषणातून अनेक सभा गाजविल्याच बघायला मिळत. प्रत्तेक भाषणातून त्यांनी बाळासाहेबांची शैली वेळोवेळी दाखवून दिलीये.