Home » ९० च्या आशिक लोकांचा ह्या दर्दी गायकावर सुद्धा आत्महत्येची वेळ आली होती
खास किस्से मायानगरी

९० च्या आशिक लोकांचा ह्या दर्दी गायकावर सुद्धा आत्महत्येची वेळ आली होती


उदित नारायण बॉलीवुडमधील एक शानदार गायक. त्यांच्या कोमल आवाजाला अजून देखील बॉलीवुडमध्ये कोणीच तोड देऊ शकत नाही. बिहारमधील सुपौल जिल्ह्यात उदित नारायण यांचा 1 डिसेंबर1955 साली जन्म झाला होता. उदित नारायण यांना बॉलीवूडमध्ये स्वताचे स्थान निर्माण करण्यासाठी तब्बल 10 वर्ष लागली होती.

कयामत से कयामत हा चित्रपट आला आणि उदित नारायण त्यांच्या एका गाण्यामुळे रातोरात सुपरस्टार झाले. ते गाणं होतं ‘पापा कहते हैं बेटा नाम… या गाण्यासाठी उदित नारायण यांना अनेक अवॉर्ड देखील मिळाले. त्या नंतर मात्र उदित नारायण यांनी मागे वळून पहिलेच नाही. त्यांनी अनेक सुपरहिट गाणी त्यांच्या आवाजात गायली. हिंदी, तमिळ, तेलगू, भोजपुरी,बंगाली, नेपाळी भाषेत देखील त्यांनी गाणी गायली.

तरी देखील आत्महत्या करायची होती – करण जोहरचा कुछ कुछ होता है चित्रपट ब्लॉक बस्टर ठरला. या चित्रपटांतील सुपर हीट गाणी उदित नारायण यांनी गायली होती. उदित नारायण यांना या यशानंतर अनेक धमकीचे कॉल येऊ लागले. काही त्यांना खंडणी मागत तर काही त्यांना धमकावत. काही लोकांनी तर उदीत नारायण यांची सुपारी देऊन त्यांना संपवायला सांगितले होते. पोलिसांनी त्या लोकांना पकडले देखील पण सततच्या या त्रासामुळे उदित नारायण पुरते वैतागले होते. तेव्हा त्यांना आत्महत्या करावी असे वाटले होते. 1998 ते 2019 तब्बल इतके वर्ष उदित नारायण यांना धमकीचे कॉल येत असतं.