Home » सावरकरांना कायद्याची परीक्षा चांगल्या श्रेणीत पास होऊन देखील वकील पदवी मिळाली नव्हती
खास किस्से

सावरकरांना कायद्याची परीक्षा चांगल्या श्रेणीत पास होऊन देखील वकील पदवी मिळाली नव्हती

महाराष्ट्रातील नाशिकजवळील भागपूर गावात एका स्वातंत्र्य सेनांनीचा जन्म झाला. ज्याने त्यांच्या देश प्रेमाखातर अनेक यातना सहन केल्या. आज वीर सावरकर यांची जयंती, त्या निमित्याने त्यांच्याविषयी काही माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

28 मे 1883 रोजी सावरकरांचा जन्म झाला. सावकर यांना प्रखर बुद्धिमत्ता लाभली होती. ते प्रचंड हुशार होते. ते त्यांचे रोखठोक विचार मांडत. लोकमान्य टिळक यांचे केसरी वर्तमानपत्र वाचून त्यांच्या मनात देशभक्ती अधिकच जागृत झाली. मनात अनेक क्रांतिकारी विचार सुरू झाले. त्यातूनच त्यांनी अनेक देशभक्तीपर कविता आणि लेख देखील लिहिले.

सावकरांना देशप्रेमासाठी अनेक यातना सहन कराव्या लागल्या. सावरकर असे पहिले कैदी होते ज्यांना फ्रान्समध्ये अटक करण्यात आली.सावरकरांच्या द इंडियन वार ऑफ इंडिपेंडेंस -1857 या पुस्तकांवरुन देखील मोठी खळबळ माजली होती. हे पुस्तक प्रकाशित होण्याअगोदर त्यावर दोन देशांनी बंदी देखील घातली होती.

सावरकर यांना इंग्रजांनी काळ्या पाण्याची शिक्षा केली होती. त्यावेळी सावरकर अंदमानात एकांतवासात होते. त्यांच्याकडे तेव्हा कागद, पेन देखील नव्हते. तुरुंगाच्या भिंतीवर सावरकरांनी खिळे आणि कोसळा वापरुन अनेक कविता लिहिल्या. या कविता त्यांनी पाठ देखील केल्या. जेव्हा तुरुंगातून त्यांची सुटका झाली तेव्हा ते बाहेर आले. त्यांनी त्या कवितांचे एक पुस्तक केले.

सावरकर हे पहिले भारतीय होते, जे कायद्याची परीक्षा पहिल्या प्रयत्नात, पहिल्या श्रेणीत पास झाले तरी देखील त्यांना वकील ही पदवी मिळाली नाही. कारण सावरकरांनी ब्रिटीशी सरकारशी एकनिष्ट राहण्याची शपथ घेण्यास नकार दर्शविला. त्यामुळे त्यांना वकील ही पदवी मिळाली नाही.