वॉशिंग पावडर बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, या बाबीचा विचार करता वॉशिंग पावडरच्या जाहिराती सतत चालू असतात.अशीच एक निरमा वॉशिंग पावडरची जाहिरात सर्वांच्या लक्षात राहिलेली आहे.त्यातली लहान मुलगी स्वताचा पांढरा फ्रॉक फिरवताना सफेदीची चमकर दाखवली गेली आहे.कालपरत्वे ही जाहिरात बदलत गेली.हेमामालीनी पासून इतर नवोदित नायिकांनीही या जाहिरातीत काम केल असून या जाहिरातीच पुढील गाण अत्यंत लोकप्रिय ठरलेल आहे.
“हेमा, रेखा, जया और सुषमा, सबकी पसंद निरमा वॉशिंग पावडर निरमा.कपडे धुण्याची पावडर म्हणजे निरमा हे समीकरणच होऊन बसले होत.निरमा पावडरचे संस्थापक करसन भाई पटेल यांनी त्याकाळी मोठमोठ्या ब्रँडना माग टाकल होत साबणाची ही वडी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या रेटमध्ये म्हणजे ३₹ मिळत होती.याउलट १९६९साली हिंदुस्थान युनिलिव्हरन सर्फ नावाची पावडर बाजारात आणली.परंतु ही पावडर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नव्हती.
कोण आहेत करसनभाई पटेल
करसनभाई पटेल मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले होते.गुजरातच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले होते.ते स्वता गुजरातच्या खनिकर्म आणि भूविज्ञान विभागात रसायनशास्त्रज्ञ होते इतक असूनही ते सर्फची पावडर विकत घेऊ शकत नव्हते.परिणामी डिटर्जंटच्या बाजारात ते उतरू पाहत होते. सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत पावडर आणि साबण वडी काढण्याचा त्यांचा हेतू होता.करसनभाईंनी अहमदाबादला स्वताच्या घरातच ही साबण वडी तयार करायला सुरुवात केली.त्यांनी स्वताचा रसायन शास्त्रातील अनुभव वापरत पिवळ्या रंगाची साबण पावडर ३रुपयात उपलब्ध करून दिली.
निरमा नावामागची कहाणी
करसनभाईंनी साबणाच नाव आपली दिवंगत मुलगी निरुपमा पटेल हिच्या नावावरून निरमा अस ठेवल.या साबणाच मार्केटिंग करताना त्यांनी घरोघरी जाऊन साबण विकला. साबण न आवडल्यास पैसे परत देण्याची तयारी दाखवली.या सर्वांचा परिणाम म्हणजे निरमा सर्वदूर पसरला.करसनभाईंनी धाडस करत सरकारी नोकरी सोडत या धंद्यात पूर्णपणे झोकून द्यायच ठरवल. व्यापार उभा करण इतक सोप नव्हत सरकारी नियम पाळून व्यवसाय चालवण आर्थिक तसदीच होत. करसन भाईंनी उमेद न हरता टिव्हीवर निरमाची जाहिरात सुरू केली.परिणामी महिनाभर झालेल्या जाहिरातीने निरमाची मागणी वाढली.
व्यवसायाचा विस्तार
करसनभाईंनी साबण पावडरबरोबर इतर प्रॉडक्ट जसे टूथपेस्ट, शाम्पू बनवायला सुरुवात केली.निरमाच्या सगळ्या प्रॉडक्टना प्रतिसाद मिळू शकला नाही. परंतु निरमा साबण आणि पावडरने ५५टक्के मार्केट शेअर काबिज केले आहे.१९९५मध्ये करसनभाईंनी अहमदाबाद येथे निरमा युनिव्हर्सिटी आॅफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी उघडले. २०१०साली त्यांना पद्मश्री तर २००७ते २०१७फोर्ब्सच्या यादीत श्रीमंतांच्या यादीत त्यांचा नंबर समाविष्ट होता.कोणतीही मॅनेजमेंटची पदवी नसताना करसन भाईंनी व्यवसायाची यशस्वी भरारी घेतलेली आहे.
Add Comment