Home » सगळे फ्रॉड ‘लंडनला’ का पळून जातात ? त्यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का?
खास किस्से

सगळे फ्रॉड ‘लंडनला’ का पळून जातात ? त्यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का?

भारत गेल्या काही वर्षांपासून स्कॅम आणि बँकांची कर्ज बुडीत करणाऱ्यां मोठ्या उद्योगपतींमुळ त्रस्त आहे. या सर्व बड्या धेंडांची एकच टेन्डन्सी दिसून येते. मोठ्या प्रमाणावर कर्ज काढण आणि कालांतरान ती बुडवून पलायन करण. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील कर्ज बुडीत करण त्यांना शक्य कस होत? तर याच उत्तर आहे हे सगळे उद्योगपती कायद्याची उत्तम जाण ठेवतात. या लोकांचे राजकीय संबंधही निकटचे असतात. भारतीय सहिष्णुता यांच्या परिचयाची असते. या सर्व फ्रॉड करणाऱ्यांची आणखी एक समानता म्हणजे कर्ज बुडीत घोषित होण्यापूर्वीच हे पळपुटे लंडनला पळून जातात. नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि मेहूल चोक्सी ही सध्याच्या बुडव्यांची नाव चर्चेत असून ही सगळी लंडनला पळून गेली आहेत.

नीरव मोदीन PNB म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेचा १३००० कोटींच कर्ज बुडीत केल आहे. यात त्याचा काका मेहूल चोक्सी त्याचा साथीदार असून त्याने बार्बोडसच नागरिकत्व मिळवल आहे, तर नीरव मोदी लंडनमध्ये वास्तव्यास आहे. लंडनच्या ‘द टेलिग्राफ’ या वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार नीरव मोदी सध्या लंडनच्या वेस्ट एंड भागातील ७५ करोड रुपयांच्या अपार्टमेंटमध्ये राहत आहे. याच वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार भारताचा दुसरा कर्ज बुडवा ज्याने अनेक बँकांची कर्ज बुडीत केली तो विजय मल्ल्या उर्फ लिकर किंग, किंगफिशरचा सर्वेसर्वा याने लंडनमध्ये ११.५ मिलियन पाँडचा बंगला घेतला आहे. लंडनच ऐश आरामी जगण तसच २ मिलियन पाँडमध्ये मिळणारा गोल्डन विजा यामुळे हे बुडवे लंडनला पळून जातात.

यामुळे हे सगळे फ्रॉड उद्योगपती लंडनलाच पळून जातात..

लंडनमध्ये गोल्डन विजामुळे उत्तम दर्जाच्या सवलती मिळतात. लंडनमध्ये भारतीय रहिवासी मोठ्या प्रमाणावर असून भारतीय जेवण सहज मिळू शकत. अनेक बॉलीवूड कलाकारांची घर लंडनमध्ये आहेत. या सगळ्या बरोबरच भारत हा ब्रिटीश साम्राज्याचा भाग राहिलेला आहे. परिणामी भारताचे आणि लंडनचे बरेचसे कायदे एकसारखे आहेत. भारताने सध्या विजय मल्ल्यावर प्रत्यार्पणाची केस घातली आहे परंतु लंडन कोर्टात विजय मल्ल्याची बाजू ऐकून संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच प्रत्यार्पणा करण्याची भूमिका लंडन कोर्टाने घेतली आहे. अशावेळी मल्ल्याच्या वकिलाने भारतीय जेल त्याच्यासाठी योग्य नसून त्याचे प्रत्यार्पण करू नये असा युक्तिवाद केला आहे. तर नीरव मोदीन जीवाची भीती व्यक्त केली आहे. परिणामी अशा परिस्थितीत ह्युमन राईटचे कारण पुढे करून या बुडव्यांचे प्रत्यार्पण टळले आहे. या सगळ्याचा फायदा घेत निरव मोदीने लंडनमध्ये राजनैतिक शरण मागितली आहे.

बीबीसी लंडनच्या संवादकर्ता नरेश कौशीकने सांगितल्यानुसार राजनीतीक शरण रद्द होईपर्यंत कायदा नीरव मोदीला संपूर्ण मदत करतो. असे असूनदेखील भारत सध्या मजबूत स्थितीत असून ब्रेक्झीटमधून बाहेर पडल्यानंतर लंडनला महत्वाचा देश वाटतो. लंडनला भारताबरोबर मुक्त व्यापाराची संधी साधायची आहे. परिणामी भारतान आशावादी राहायला काहीच हरकत नाही.