सुशांत सिंगच्या सुसाईड अटेप्ट करण्यान मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्याच अनन्य साधारण महत्त्व प्रत्येकाच्या लक्षात आले आहे. सुशांत सिंग गेले सहा महिने डिप्रेशनवर औषधोपचार घेत होता. इतका हुशार आणि हरहुन्नरी असणारा तसेच त्याला आवडलेल्या क्षेत्रातच करियर करण्याची संधी मिळालेला हा नायक नैराश्याने ग्रासला होता. इतक्या तरूण वयात उमेद हरवून मरणाला जवळ करण्याच्या त्याच्या निर्णयान सगळेच शोकात आहेत.

सध्याच्या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात सगळ्यांचीच थोड्याफार फरकाने दमछाक होते. टेक्नॉलॉजीतील आमूलाग्र बदलामुळे माणसाचे शारीरिक श्रम कमी झालेले असून मेंदूचा वापर वाढलेला आहे. बाजाराच बदलत स्वरूप आणि त्यानुसार राहणीमानात होणारे बदल सातत्याने मुड बदलण्यास कारणीभूत ठरतात. आर्थिक अपेक्षांच वाढत ओझ, वाढलेल्या गरजा, त्यावरून एकमेकांत होणारी स्पर्धा यामुळे नितळ वातावरण उरत नाही. पूर्वीसारखी एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत असून विभक्त कुटुंब पद्धती मेट्रो सिटीत वाढीला लागली आहे. नवरा बायको आणि दोन किंवा एकच अपत्य अशी रचना असणाऱ्या या कुटुंबात दोघेही नोकरी करणारे असतील तर कौटुंबिक आयुष्यासाठी मिळणारा वेळ अपुरा पडतो. कुटुंबातील संवाद कमी होतो. लिव इन रिलेशनशीप असल्यास कमिटमेंट, एकमेकांवरील विश्वास, खर्चाची वाटणी तसेच एकमेकांची स्पेस सांभाळण गरजेच असत.

आयुष्य जगताना स्वप्न, ध्येय असण, आणि त्यानुसार वाटचाल करण हे उमेद आणि उत्साहाच लक्षण आहे. परंतु या वाटचालीत येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी मनोशारीरिक आरोग्य उत्तम असण्याची निकड असते. बहुतांश वेळा आपण मनाच्या कलाचा विचार करताना दिसत नाही. काही बाबतीत मनाला मुरड घालण आणि काही बाबतीत पुश करण जमाव लागत. “मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण” या उक्तीनुसार मनाला नेहमी फ्रेश, सकारात्मक ठेवल्यास संपूर्ण आयुष्य तर आनंदी होतच पण यशसुद्धा मिळत. शरीराप्रमाणेच मनाची काळजी घेण जरुरी आहे. कशाप्रकारचे आहेत रिलॅक्स लाईफस्कील आपण जाणून घेऊया.
- स्वतःवर आणि प्रियजनांवर प्रेम करा. आपण प्रत्येक कृती स्वताच्या किंवा प्रियजनांच्या सुखासाठी करतो तेव्हा मटेरियलिस्टीक प्रेमाआधी स्वतःवर आणि प्रियजनांवर निशर्त प्रेम करा. स्वतःसाठी, त्यांच्यासाठी वेळ काढा. आवडत संगीत ऐकण, छंद जोपासण, आवडी जोपासा, अडचण आल्यास कुटुंबाला, प्रियजनांना सांगून मन मोकळ करा. सपोर्ट सिस्टिम ठेवा. सल्ला घ्या. कुटुंबासमवेत एकत्र जेवण घेण, फिरायला जाण, गप्पा मारण एकमेकांची विचारपूस करण यामुळे मन मोकळ होण्यास मदत होते.
- कामाच्या ठिकाणी सौहार्द वातावरण ठेवा. सहकार्यांना कामात मदत करा आणि मागा. स्पर्धा निकोप ठेवा. प्रसंगी माघार घेण शिका. अपयशान खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा. झेपतील इतकीच आव्हान स्वीकारा. मैत्रीपूर्ण संबंध कामात पाॅजीटिव्ह एनर्जी देतात.
- नात्यांचा आदर करा. डोळस नाती निवडा प्रेमात असाल तर स्वताला या नात्याविषयी प्रामाणिक मत विचारा आणि नात पुढ न्या. समोरचा प्रतिसाद जरूर पडताळा, एकतर्फी नात उगाचच तुमच्याकडून निभावत राहू नका. तडजोड शक्य असल्यास जरूर करा. अन्यथा परस्पर सामंजस्याने वेगळ व्हा.
- आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवा योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊनच इनवेस्टमेंट करा. सोईनुसार प्रत्येक वर्षाच आर्थिक ध्येय ठरवा आणि त्यानुसार नियोजन करा. नियोजन बिघडल्यास सल्ला घ्या. न खचता ध्येय पुढे ढकला.नोकरीबाबत,धंद्याबाबत समस्या आल्यास कुटुंबाची, मित्रांची मदत घ्या. निःसंकोचपणे आर्थिक किंवा लागेल ती मदत मागा आणि करा. “सर सलामत तो पगडी पचास” हे नेहमी लक्षात ठेवा.
- स्वताच्या आणि प्रियजनांच्या आवडी निवडी जरूर जोपासा. विशिष्ट पदार्थ, संगीत, नाटक, पुस्तक, चित्रपट, एखादी कला यांचा आस्वाद घ्या. जुन्या मित्रांशी, नातेवाईकांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवा. त्यांना फोन करण, गप्पा मारण, कौटुंबिक समारंभाना उपस्थित राहण जरूर करा. परिणामी तुमचा संपर्क त्यांच्याशी सतत राहील.
- भूतकाळ उगाळू नका. भूतकाळातील त्रासदायक घटना आठवून मनाला दुखी करु नका. जे घडून गेलय त्याविषयी शोक करू नका, तसच भविष्याची अवास्तव काळजी करू नका. पुढे काय घडेल याची नेमकी कल्पना नसताना उगचच चिंतीत होऊ नका. थोडक्यात भूतकाळाचा शोक आणि भविष्याची काळजी करून तुमचा वर्तमान दुखी, चिडचिडा करू नका.
- सगळ्यात शेवटच आणि महत्वाच म्हणजे जेवणाच्या तसेच झोपेच्या वेळा पाळा. सकस, ताजा, पारंपारिक आहार घ्या व आठ ते दहा तासाची पुरेशी झोप घ्या. रोज दिवसभरातील एक तास काढून व्यायाम, योगासन, प्राणायाम, अध्यात्म यांचा अवलंब करा. मनाच्या आरोग्यासाठी योगासन, प्राणायाम आणि ध्यान उत्तम बुस्ट असून व्यायाम आणि खेळान खिलाडू वृत्ती वाढते, स्टॅमिना डेव्हलप होतो, उत्साह, चैतन्य वाढत. शरीर-मनाच्या सुदृढतेने सकारात्मक विचार वाढून उमेद येते. आयुष्यात वेगवेगळ्या स्वभावाची, वृत्तीची माणस भेटतात त्यांना आहे तस स्वीकारा. प्रत्येकाशी मैत्री करायची गरज नसून काही ठिकाणी प्रोफेशनल संबंध ठेवा. नात्यात गैरसमज होऊ देऊ नका. नात्यात स्नेहबंध वाढवा. आयुष्याइतक दुसर काहिही मोलाच नसून त्यावर भरभरून प्रेम करा.
Add Comment