Home » ‘मुंबईत कोरोना सात दिवसांत सातपट वाढला; हलक्यात घ्याल तर..’
आरोग्य

‘मुंबईत कोरोना सात दिवसांत सातपट वाढला; हलक्यात घ्याल तर..’

Maharashtra Corona News: गेल्या सात दिवसांत राजधानी मुंबईतील (Coronavirus Mumbai Cases) कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातपाटीने वाढ झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. त्यामुळे इथून पुढे नागरिकांनी कोरोना निर्बंधाकडे दुर्लक्ष केल्यास संख्यात्मक वाढीने त्यांची किंमत मोजावी लागेल, अस आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितलं.

20 डिसेंबरला राज्यातील एकूण सक्रीय रुग्णांच्या संख्येचे प्रमाण 5000 ते 6000 इतके होते. तोच आकडा मंगळवारी 11492 इतका झाला. आणि तोच आकडा आज पुन्हा 20 हजारांच्याही पुढे जाऊ शकतो. यावरून सात दिवसांमध्ये सक्रीय रुग्णांचे प्रमाण हे मागील सात दिवसांत सातपटीने वाढल्याच दिसत. आता हीच परिस्थिती एकाच दिवसांत दुप्पट देखील होऊ शकते, असा इशारा राजेश टोपे यांनी दिलाय.

देशाची राजधानी दिल्लीत परिस्थिती आतापासूनच चिंताजनक आहे. दिल्लीत सध्या पूर्वीप्रमाणे लॉकडाऊनचे सगळे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतही कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी निर्बंध हे पाळावेच लागतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आरोग्य खात्याचे अधिकारी आणि टास्क फोर्स यांची यासंदर्भातील महत्वाची बैठक होणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितल आहे. या बैठकीत मुंबई आणि राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन कोरोनाचे आणखी कठोर निर्बंध लागू केले जाऊ शकतात (Corona Updates).