Home » फक्त 2 वर्षांचा पोरगा, दिवसाला 40 सिगरेट ओढायचा; सवय सोडताच ‘हा’ झाला बदल
आरोग्य

फक्त 2 वर्षांचा पोरगा, दिवसाला 40 सिगरेट ओढायचा; सवय सोडताच ‘हा’ झाला बदल

हा आहे इंडोनेशियातील सगळ्यात लहान वयाचा चेन स्मोकर. अर्दी रिजाल असं त्याचं नांव आहे. तो सुमात्रा या गावात राहतो. सात वर्ष्यांपूर्वी त्याला सिगारेट चे इतके भयंकर व्यसन होत कि दिवसाला तो ४० सिगारेट ओढायचा. त्यावेळी सोशल मिडीयावर तो चांगलाच व्हायरल झालेला होता.

अवघ्या २ वर्षांचा असताना सिगारेट ची त्याची तल्लफ बघून चांगले चांगले हैराण होते. आता त्याने सिगारेट पिणे सोडून दिलंय. आधी जसा तो दिसायचा त्यावरून आता सिगारेट सोडल्यानंतर तो ओळखायला सुद्धा कठीण आहे. आत्ताही जगभरात या पठ्ठ्याची चर्चा सुरु आहे.

चेन स्मोक करत असताना त्याची अवस्था अत्यंत वाईट झालेली होती. सिगारेट पिऊन भिंतीवर डोक आपटायची सवय त्याला लागली होती. 2010 मध्ये सिगारेट पिऊन,तोंडातून धूर काढतानाचा त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

अर्दीने 2017 च्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगलीतलय की, तो अगदी अठरा महिन्यांचा असतानी त्याच्या वडिलांनी त्याला पहिल्यांदा सिगारेट ओढायला दिली. पुढे तो म्हणाला, सिगारेट सोडणे खूप अवघड आहे. जर मी सिगरेट नाही प्यायलो तर, माझ्या तोंडाची चव जाते आणि माझ डोकं गरगरू लागत. 

सिगारेट सोडण तितकं सोपही नाहीये, पण हा इतका अवघड प्रयत्न त्याने यशस्वीपणे पूर्ण केला. अर्दी आता फळे आणि भाज्याही खायला लागलाय. ज्यामुळे त्याच्या शरीरात अनेक अमुलाग्र बदल घडून आल्याचं दिसू लागलं.

सिगारेट सोडल्यानंतर अर्दी स्वताहून म्हणतो, की मी खूप आनंदी आहे. आधीपेक्षा जास्त उत्साही झालो आहे. माझे शरीरही आता आधीपेक्षा अधिक सुधृढ झाल्याच जाणवते.