Home » ओमिक्रॉनमुळे राज्यात नवीन नियमावली: जमावबंदी लागू, लवकरच नाईट कर्फ्यु लागणार
आरोग्य काय चाललंय?

ओमिक्रॉनमुळे राज्यात नवीन नियमावली: जमावबंदी लागू, लवकरच नाईट कर्फ्यु लागणार

राज्यातील कोरोनाची परिस्थिती पुन्हा ढासळणार अशी चिन्हे आहेत. ओमिक्रॉनची (omicron) ची वाढणारी रुग्णसंख्या पाहून राज्यात पुन्हा नाईट कर्फ्युलागू (night curfew in Maharashtra) करण्यात आलाय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी कालच टास्क फोर्सची एक बैठक घेतली होती. त्यानंतर मोठा हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातील अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे.

राज्यात कोविड रुग्नसंखेत होणारी वाढ लक्षात घेऊन, त्यासंदर्भात कुठले निर्बंध लावता येऊ शकतात यासाठी हि बैठक घेण्यात आली होती. या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. आगामी काळात नाताळ (christmas), नववर्ष (new year) स्वागत असे अनेक प्रसंग लक्षात घेऊन त्यासंदर्भात गर्दी कशी कमी करता येईल तसेच लग्नसमारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल आणि उपहारगृहातील गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी कुठले निर्बंध लावता येतील यादृष्टीने याबद्दल नियमावली जाहीर करण्याचं ठरवले गेले.

ओमिक्रॉनची सध्याची परिश्तिती आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपापल्या पातळीवर बैठका घेतल्या. या घेतल्या गेलेल्या बैठकांमध्ये येणाऱ्या 15 दिवसांचा आढावा घेण्यात आल्याची माहिती आहे. जानेवारी-फेब्रुवारी हा ओमिक्रॉनचा पीक पिरीयड असण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. त्या अनुषंगाने संबंधित पावले उचलली जात आहेत.