Home » या कारणांमुळे हातापायांना मुंग्या येतात, जाणून घ्या सविस्तर
Health आरोग्य

या कारणांमुळे हातापायांना मुंग्या येतात, जाणून घ्या सविस्तर

एका जागेवर खूप वेळ हात-पाय आखडून बसल्यावर हातापायांना मुंग्या येतात. हाता पायाला मुंग्या आल्यावर त्या भागामध्ये काही संवेदना थोडावेळ जाणवत नाहीत. हात पाय आखडुन घेतल्यास शरीराच्या जास्त दाब येत असल्यामुळे हाता पायांच्या शीरांवर ताण आल्यामुळे बधीर झाल्यासारखे वाटते या भागाला झटकले असता शरीराला आलेल्या मुंग्या नाहीशा होतात.

शरीरातील काही भागांत प्रामुख्याने मुंग्या येतात ते म्हणजे हात पाय आणि खांदे यांना होय.सामान्यपणे या भागांवर जास्त वेळा मुंग्या आल्यासारखे होते।शरीराला मुंग्या येणे.ही एखादी मोठी समस्या नाहीये मात्र याचे कारणे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

शरीराच्या योग्य वाढीसाठी  सर्वच पोषक घटक आणि  जीवनसत्त्व यांचे प्रमाण शरीरामध्ये संतुलित राहणे आवश्यक आहे.जीवनसत्वाच्या अभावी शरीरामध्ये निरनिराळ्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. शरीरात मुंग्या वारंवार येत असतील तर जीवनसत्व ब 12ची कमतरता आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेली असते. यासाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा.

आधुनिक काळातील कामाची शैली ही तंत्रज्ञानावर आधारित आहे. दिवसभर तासन्तास संगणक किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर कामामध्ये व्यस्त राहिले जाते.खूप जास्त वेळ संगणकासमोर बसून टायपिंग किंवा तत्सम कामे केली असता शिरा गळून जातात, नसांवर ताण येतो त्यामुळे हाताला मुंग्या येतात.

मानेवर ताण किंवा मानेत उसण भरली असता पाठीमागून पायापर्यंत किंवा हाताला मुंग्या येतात. अशावेळी माने मध्ये भरलेल्या उसण किंवा लचक कमी करण्यासाठी फिजोओथेरपी ट्रिटमेंट घ्यावी.

केवळ एकाच स्थितीवर असल्यामुळे शरीराला मुंग्या येतात असे नाही तर आरोग्य विषयक समस्या किंवा आजार असतील तरीसुद्धा शरीराला मुंग्या येतात. मधुमेह असलेल्या व्यक्तीला शरीराला मुंग्या येण्याची समस्या सतावते. थायरॉईड ची समस्या असेल तरीसुद्धा शरीरामध्ये मुंग्या येण्याचे प्रमाण जास्त असते.

मुंग्या येण्याच्या या समस्येवर काही घरगुती उपचार खूप पूर्वीपासून केले जातात।लसुन आणि सुंठ पावडर एकत्र करून हे मिश्रण सकाळी अनशापोटी सेवन केलं तर शरीरात निर्माण होणाऱ्या मुंग्या कमी होतात.

शरीरात निर्माण होणाऱ्या मुंग्यांपासून आराम मिळवण्यासाठी दररोज रात्री तुपाने हाता पायांना मालिश करण्याचाही सल्ला दिला जातो.