Home » थिएटर बाहेर प्रेयसीला भेटायला गेलेला अमोल सुपरस्टार झाला..
खास तुमच्यासाठी! मायानगरी

थिएटर बाहेर प्रेयसीला भेटायला गेलेला अमोल सुपरस्टार झाला..

बॉलीवुडमध्ये येणाऱ्या प्रत्येक कलाकाराला असं वाटतं असतं की आपण नायक न बनता महानायक बनावं, पण आपला मराठमोळा कलाकार अमोल पालेकर याला मात्र कधीच असं वाटलं नाही. कारण त्याला कधीच अभिनेता बनायचं नव्हतं. अमोल स्वतः म्हणतात की मी एक प्रशिक्षत चित्रकार, अपघाताने झालेला अभिनेता आणि काळाच्या ओघात तयार झालेला दिग्दर्शक आहे.

अमोल पालेकर अचानक नाट्यक्षेत्रात आले आणि नंतर रीतसर शिक्षण घेऊन उत्तम अभिनेते झाले. अमोल पालेकर यांची एक मैत्रीण म्हणजेच प्रेयसी होती तिला नाट्यक्षेत्रात फार रस होता. ती अनेक नाटके देखील करत. अमोल पालेकर त्यांच्या त्या मैत्रिणीला भेटण्यासाठी थिएटरच्या बाहेर उभे राहत. एक दिवस असेच ते थिएटरच्या बाहेर उभे होते, सत्यजीत दुबे या नामांकित रंगकर्मीचे लक्ष अमोल यांच्याकडे गेले. दुबे यांनी अमोलला त्यांच्या शांतता.. कोर्ट चालू आहे. या नाटकात काम करण्याचा आग्रह केला. हे नाटक प्रचंड गाजलं.

अमोल यांचा अभिनय प्रेक्षकांना भलताच आवडला. अभिनयाचे रितीसर शिक्षण घे असा सल्ला सतयजित यांनी अमोल यांना दिला. त्यांनी तो सल्ला मानला. अभिनयाचे रीतसर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अनेक नाटकात काम केले. बासु चटर्जी यांनी अमोलला त्यांच्या रजनीगंधा या चित्रपटात घेतले.

अमोलचा हा पहिला सिनेमा आणि तो सुपरहिट ठरला. मग मात्र अमोलने मागे कधीच वळून पाहिले नाही. चित्तचोर’,‘घरौंदा’, ‘मेरी बीवीकी शादी’, ‘बातो-बातो में’, ‘गोलमाल’, ‘नरम-गरम’, ‘श्रीमान श्रीमती यासारखे एक सो एक उत्तम सिनेमे दिले. अमोल यांनी जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्समधून देखील त्यांनी चित्रकलेची पदवी घेतली आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे अमोल यांच्या सुरवातीच्या तीन चित्रपटांनी सिल्व्हर ज्यूबली केली होती.

यामध्ये रजनीगंधा (1974), छोटी सी बात (1975), और चितचोर (1976) या चित्रपटांचा समावेश होता.तीन चित्रपट सुपर हीट होऊन देखील अमोल तेव्हा सुद्धा बँकेत काम करत होते. त्या नंतर त्यांनी बँकेतील नोकरी सोडली. तब्बल आठ वर्ष त्यांनी बँकेत नोकरी केली.

अमोल खऱ्या आयुष्यात एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले होते, चित्रपटांत देखील ते तशाच भूमिका करत. अमोल यांना प्रसिद्धी कधीच जास्त रुचली नाही. ते कधीही कोणाला ही ऑटोग्राफ देखील देत नसत. अमोल यांनी अनेक उत्तम सिनेमात काम केले. अनेक उत्तम सिनेमे बनविले. आणि पुन्हा ते त्यांच्या छंदाकडे वळाले ते म्हणजे चित्रकला होयं. कारण चित्रकला त्याचं पहिलं प्रेम होतं.