Home » आता हा गोंगाट बंद होईल अशी आशा प्राजक्ताची ती पोस्ट तूफान व्हायरलं
मायानगरी

आता हा गोंगाट बंद होईल अशी आशा प्राजक्ताची ती पोस्ट तूफान व्हायरलं


अभिनेत्री प्राजक्ता माळी एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ता नेहमी चर्चेत असते. प्राजक्ता तीचे सुंदर फोटो आणि विडियो देखील शेअर करत असते. प्राजक्ताने काल एक पोस्ट शेअर केली आणि ही पोस्ट तूफान व्हायरलं झाली, ही पोस्ट होती ती सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या भोंगा प्रकरणावर.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व मशिदीवरील भोंगे हे काढून टाकावेत अन्यथा मनसे कार्यकर्ते सर्वत्र हनुमान चालिसा वाजवतील. प्राजक्ताने काल ईद आणि अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या. प्राजक्ताने तीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. प्राजक्ताने तिचा एक पारंपारिक साडीतील एक फोटो शेअर केला आहे. तसेच तिने वर्तमान पत्रातील बातमीचा फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे उतरवण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. अशी बातमी आहे. प्राजक्ता म्हणते सर्वांना सुख- समाधान आणि ऐश्वर्य मिळावे अशी आशा करते. सर्व हिंदू बांधवांना अक्षय तृतीयेच्या तर मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा. असो आज ३ तारीख आज अपेक्षा आहे की उद्यापासून गोंगाट बंद होईल. #शांतता प्रिय #त्रस्तनागरिक तसेच तिने राज ठाकरे यांचे आभार मानले आहे. संभाजी नगरच्या सभेची देखील स्तुती केली आहे.