Home » बर्थडेपार्टीत जेनेलिया आणि सलमानचा धम्माल डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल
झाल कि व्हायरल! मायानगरी

बर्थडेपार्टीत जेनेलिया आणि सलमानचा धम्माल डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल

बॉलीवूडचा दबंग भाई अभिनेता सलमान खान सध्या जोरदार चर्चेत आहे. सलमानचा नुकताच 56 वा वाढदिवस झाला आहे (Salman Khan Birthday). त्याने त्याच्या पनवेल इथल्या अर्पिता फार्महाऊसवर वाढदिवस मोठ्या धमाक्यात साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत कटुंबातील लोकं आणि अनेक मित्रमैत्रिणी सामील होते. बऱ्याच बॉलीवूड सेलेब्रिटींनी सलमानच्या बर्थडे पार्टीत हजेरी लावली होती.

सलमानच्या पनवेल इथल्या फार्महाऊसवर (Arpita Farms Panvel) या बर्थडे पार्टीच आयोजन करण्यात आलेलं होत. यात अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh), जेनेलिया डिसूझा-देशमुख, संगीता बिजलानी अशा अनेक बड्या सेलेब्रिटींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. पण, आता या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होतांना दिसत आहेत.

या पार्टीतील सगळ्यात जास्त व्हायरल होणारा व्हिडिओ म्हणजे सलमान आणि जेनेलिया या दोघांचा (Salman and Genelia Dance). या दोघांनी सोबत एक धम्माल डान्स केल्याचा हा व्हिडिओ आहे. जो सगळ्यात जास्त व्हायरल होतांना दिसतोय. सारख्याच रंगाच्या ड्रेस मध्ये सलमान आणि जेनेलिया या दोघांनी एकत्र डान्स केला. हा व्हिडिओ खुद्द जेनेलिया ने सलमान ला शुभेच्छा देत शेअर केलाय. ‘आज भावाचा बर्थडे आहे’ असं कॅप्शनही तिने या व्हिडिओला दिल आहे.

बर्थडेच्या आदल्याच दिवशी सलमान खानच्या चाहत्यांसाठी चिंतेत टाकणारी एक बातमी आली ज्यामुळे अनेकांनी त्याच्या तब्बेतीची विचारपूस करायला सुरुवात केली. ती बातमी होती सलमान खानला सर्पदंश झाल्याची (Salman Khan Snake Bite). तो त्याच्या पनवेल इथल्या फार्महाऊसवर असताना हि घटना घडली होती. पहाटेच्या सुमारास त्याच्या हाताला साप चावल्याच समजताच त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. खबरदारीसाठी सर्पदंशावरील लस त्याला देण्यात आली. त्याच्यावर उपचार करून सहा ते सात तासांनी त्याला घरी सोडण्यात अल होत. चावलेला साप हा बिनविषारी होता अस त्याचे वडील सलीम खान यांनी सांगितल होत. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला ‘काळजी घे’ सांगत सोशल मिडीयावर शुभेच्छा दिल्या.