Home » जेलमधून बाहेर येताच शिल्पा शेट्टी च्या नवऱ्याने शर्लीनचा असा घेतला बदला!
मायानगरी

जेलमधून बाहेर येताच शिल्पा शेट्टी च्या नवऱ्याने शर्लीनचा असा घेतला बदला!

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्राची नुकतीच पोर्नोग्राफी केस प्रकरणात जामिनावर सुटका झाली. राज कुंद्रा ह्याला मुंबई पोलिसांनी अटक केलेली होती. त्या कथित गुन्ह्याची शिक्षा भोगायला कुंद्रा २ महिने तुरुंगात होता.

आता ह्या प्रकरणानंतर जामिनावर सुटलेल्या राज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी ने अभिनेत्री शर्लीन चोप्रा विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. राज कुंद्राचे वकिलांनी शर्लीन ला यासंदर्भात नोटीस देखील बाजावलीये. वकील प्रशांत पाटील यांनी अभिनेत्रीला आठवडाभरात जाहीर माफी मागावी अशी नोटीस पाठवली आहे. जर शर्लीन चोप्रा हिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची माफी मागितली नाही तर त्यांच्यावर ५ कोटी इतक्या रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला जाईल.

शर्लींचे बनावट आरोप..

शर्लीन चोप्रा हिने याआधी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्यावर जे काही आरोप केले आहे ते सर्व बनवत, खोटे, फालतू, निराधार आहेत असाही त्या निवेदनामध्ये स्पष्ट केलंय. पैसे उकळणे आणि बदनामी करणे या हेतूने हा आरोप करण्यात आले होते असही निवेदनात म्हटल गेलय. अभिनेत्री शिल्पा शेट्टी चा जेएल स्ट्रीम ॲपशी कसलाही संबंध नसल्याचा दावा त्यामध्ये केला गेलाय. शर्लीन चोप्राने केलेला आरोप हि केवळ एक कल्पना आहे आणि माध्यमांमधून शिल्पा शेट्टीचे नाव घेऊन सहज लक्ष वेधून घेणे हाच त्यामागचा हेतू होता.