पंतप्रधान मोदी यांची फिरोजपुर रॅली एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली असून आणखी एक माहिती समोर आलीये. भाजप कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या रॅलीत ५ लाख लोकं जमणार आहे असा दावा केला होता. पण प्रत्यक्षात फक्त ५ हजार लोकं जमा झाले अशी माहिती समोर आलीये. काँग्रेसचे कॉर्डीनेटर सौरभ रॉय यांनी या सभेतील फोटो ट्वीटर द्वारे पोस्ट करून सांगितले आहे. त्या फोटोमधून हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ठ होते.
भाजपने राज्यभरातील लोकांना फिरोजपुर मधील रॅलीत नेण्यासाठी ३२०० बसेस ची व्यवस्थाही केल्याचा दावा समोर येतोय. मतदारसंघांना नेण्यासाठी जवळपास ६० बसेसचीही सुविधा केली होती. पण भाजपने लोकांचा कमी उत्साह बघून बसेस ची संख्या कमी केली असून ५०० बसेस ची पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली होती. पण मोदी काही कारणास्तव तिथे पोहचू शकले नाही. मात्र पंतप्रधानांचा पंजाब येथील दौराही एका भयांकर कारणामुळे चर्चेत होता.
पंतप्रधान मोदींची फिरोजपुर येथील सभा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐन वेळेवर रद्द करण्यात आली असून कार्यक्रम ठीकानी जाणारा मोदींचा ताफा एका फ्लायओव्हरवर काही आंदोलकांमुळे जवळपास १५ ते २० मिनिटे अडकला जिथून पाकिस्तान अगदी १० कि.मी. अंतरावर होतं. असा आरोप भाजपने केला. या कारणावरून आता केंद्रामधील सत्ताधारी भाजप आणि पंजाबमधील काँग्रेस यांच्यात वाद निर्माण झालेला आहे.