Home » 100 कुत्री मिळूनही एकट्या वाघाची शिकार करू शकत नाही, राणे समर्थकांची मुंबईत बॅनरबाजी
आपलं राजकारण

100 कुत्री मिळूनही एकट्या वाघाची शिकार करू शकत नाही, राणे समर्थकांची मुंबईत बॅनरबाजी

सिंधुदुर्गातील शिवसेना कार्यकर्ता संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद आता मुंबईतही पडताना दिसून येतायेत. त्यात आणखी भर म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना महाराष्ट्र पोलिसांनी पोलीस स्टेशनला हजर राहण्याची नोटीस जरी केली. त्यानंतर, दादर (Dadar) येथील नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या समर्थनात बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. पण, पोलिसांनी ते बॅनर तत्काळ खाली उतरवून घेतले.

या वादाची सुरुवात विधिमंडळाच्या अधिवेशनात (Vidhan Sabha Winter Session) झाली होती. भाजपचे नेते नितेश राणे यांनी सुरुवातीला विधानसभेच्या पायऱ्यांवर मंत्री आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) उद्देशून म्याव-म्याव केल्यामुळे वातावरण आणखी तापल होत. त्यानंतर विधानसभेत शिवसेना (Shivsena) आणि राणे कुटुंब यांच्यातील रंगलेला सामना पाहायला मिळाला. त्यातच आता संतोष परब यांच्यावरील हल्ल्यामुळे हे प्रकरण चांगलच रंगल्याच दिसत आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामिनाबाबत आज सिंधुदुर्ग (Sindhudurg) न्यायालयात सुनावणी होत आहे. पण त्याआधीच कणकवली (Kankavli) पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजावून हजार राहण्याचं सांगितलं. सिंधुदुर्गात झालेली जिल्हा बँकेची निवडणूक आणि त्यानंतर शिवसेना कार्यकर्त्याला मारहाण यामुळे भाजपचे आमदार नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी सुरु झाली. त्यामुळे एकूणच राजकीय वातावरण चांगलच तापलेलं पाहायला मिळतय. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून नितेश राणे संपर्काच्या बाहेर आहेत, ते नेमक कुठे आहेत? हे मात्र अद्याप कुणालाच माहित नाही.

याच अनुषंगाने राणे समर्थकांकडून दादर परिसरात बॅनरबाजी करण्यात आली. ‘100 कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करू शकत नाहीत’ असा उल्लेख त्यामध्ये करण्यात आल्याचं दिसून आलं. हि बॅनरबाजी केल्याची माहिती लक्षात येताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बॅनर खाली उतरवण्यात आले. पण या बॅनरबाजीमुळे हा वाद टोकाला जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.